Daily Mahasatta

Daily Mahasatta

राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी : युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील

इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे )
         
राज्य सरकार अपयशी असुन महिलांवर अत्याचार, कोरोना रूग्ण संख्या यामध्ये देशात एक नंबर महाराष्ट्राचा आहे. गेल्या एक वर्षापासुन राज्यातील जनता सातत्याने संकटात आहे. मात्र उपाययोजना करण्यात राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली आहे .
          विक्रांत पाटील यांनी इस्लामपुर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी युवकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
श्री पाटील म्हणाले , भाजप पक्षामध्ये कर्तबगारीला, विचाराला, निष्ठेला महत्व असुन नेतृत्वात धमक असणार्‍या कार्यकर्त्याला पक्षामध्ये संधी दिली जाते. पक्षामध्ये पै-पाहुणे नातेवाईक पाहुन संधी दिली जात नाही एक सर्व सामान्य कार्यकर्ता भाजप पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होवु शकतो तर एक चहा वाला देशाचा पंतप्रधान होवु शकतो. हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होवु शकते. भाजप पक्ष हा व्यक्तीगत विकासासाठी नसुन सर्व सामान्यांच्या विकासासाठी आहे. ही या पक्षाची बांधीलकी व कर्तव्य आहे. याच विचाराचा कार्यकर्ता घडविण्यासाठी पक्ष कार्यकर्त्याना संधी देत असतो. 
         आजचा युवा मोर्चाचा आवाज हा सर्व सामान्य जनतेच्या अन्याया विरूध्द पेटुन उठणारा पाहिजे. शेतकर्‍यांच्या ऊसाला रास्त भाव मिळावा यासाठी आवाज उठविणारा पाहिजे. अनेक अधिकारी सत्ताधार्‍यांच्या दबावापोटी काम करत आहेत. अनेक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करत आहेत. अधिकार्‍यांच्या या चुकिच्या कामाचा समाचार योग्य वेळी घेतला जाईल. यामुळे आधिकार्‍यांनीही आपल्या आधिकारातुन कोणाला विनाकारण त्रास होईल असा वागू नये.
        ते पुढे म्हणाले, इस्लामपुर विधानसभा मतदार संघामध्ये निशिकांत पाटील यांनी भाजप पक्षाच्या माध्यमातुन अत्यंत चांगले काम केले आहे. विधानसभा निवडणुकित अपक्ष निवडणुक लढवुनही त्यांनी लक्ष वेधण्यासारखे मताधिक्य घेतले आहे. प्रस्तापितांनी या नेतृत्वाची दखल घेवुन राजकिय कुरघोडया सुरू केल्या आहेत. मात्र त्या कुरघोडयांचा निशिकांत पाटील यांच्यासारखे कणखर नेतृत्व पराभव करेल यासाठी भाजप पक्षाची सर्व ताकत पाठिशी सदैव राहणार आहे. सांगली जिल्हयामध्ये युवकांचे संघटन इतर जिल्हयांपेक्षा अधिक चांगले होईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
         यावेळी नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, या मतदार संघात प्रस्तापितांनी विरोधकांच्यातील एकीत कशी बेकी होईल हे तंत्र आजपर्यंत वापरून निवडणुका जिंकल्या आहेत. या मतदारसंघात सर्वांनी एकत्रित येवुन निवडणुका लढल्यातर प्रस्तापितांचा पराभव करण्यात भाजप कार्यकर्त्यांना निश्चित यश येईल.
         स्वागत प्रास्ताविक वाळवा तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केले. सूत्रसंचलन भाजपाचे सरचिटणीस संदिप सावंत यांनी केले. आभार इस्लामपुर शहर भाजपाचे फिरोज पटेल यांनी मानले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, सरचिटणीस सुशिल मेंगडे, भाजपा युवती प्रदेशच्या वैशाली खाडे, सांगली भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहित पाटील, वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील, नगरसेविका मंगल शिंगण, कु. कोमल बनसोडे, वाळवा तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखाताई मटकरी, जयश्री रणदिवे, ज्येष्ठ नेते मधुकर हुबाले, येडेमच्छिंद्रचे सरपंच गणेश हराळे, यदुराज थोरात, शरद पाटील, रावसाहेब पाटील, अजित पाटील, तानाजी पाटील, सतेज पाटील, धनराज पाटील, संजय हवलदार,अक्षय पाटील, अक्षय कोळेकर, सुभाष चव्हाण, रणजीत माने, संघटन सरचिटणीस धैर्यशील मोरे, दादासाहेब रसाळ आदिसह अन्य मान्यवर, भाजपाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments