Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात दरोडेखोरांची मोठी टोळी जेरबंद

कुपवाड ( प्रमोद अथणीकर)
         कुपवाड परिसरामध्ये अवधूत कॉलनी येथे दरोडा घालण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला घातक शस्त्रांसह पोलीसांनी जेरबंद केले आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री कुपवाड पोलिसांच्या पथकाने केली.
         याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कुपवाड येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पोलीस निरीक्षक नीरज उबाळे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांची गस्त सुरू होती. यावेळी गस्ती पथकास अवधूत कॉलनी येथील पाण्याच्या टाकी खाली पाच व्यक्ती संशयित रित्या थांबल्याचे दिसून आले. या संशयितांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना या लोकांचा संशय वाटल्याने त्यांची अंगझडती घेतली. यावेळी या पाचजणाकडे घातक शस्त्रे मिळून आली. पोलिसांनी शिताफीने या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या.
        या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोंपीची नावे : अनिल रामा पाटील (वय 29 रा. कापसे प्लॉट कुपवाड,) गणेश वसंत वारे ( वय 20 रा बाळकृष्ण नगर कुपवाड) , निलेश नाथाजी चव्हाण (वय 20 रा हनुमान नगर कुपवाड) ,सुनील बापू कदम (रा. कवलापूर रोड कुपवाड) व सुंदर चंद्रकांत कोरवे (वय 33 रा मिरज) अशी आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते दरोडा टाकण्या च्या उद्देशाने फिरत असल्याचे सांगण्यात आले.
        या पाचही संशयितांना आज शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पीएसआय राजू अन्नछत्रे हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments