Daily Mahasatta

Daily Mahasatta

ऑल महाराष्ट्र टेंट डिलर्स ऑर्गनायझेशनच्या चेअरमनपदी सागर चव्हाण

: प. महाराष्ट्र चेअरमनपदी सुनिल माळी
सांगली ता. २६ प्रतिनिधी
    ऑल महाराष्ट्र टेंट डिलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या चेअरमन पदी सागर (भाई) प्रल्हाद चव्हाण यांची निवड झाली आहे. तसेच ऑल महाराष्ट्र टेंट डिलर्स ऑर्गनायझेशनच्या पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागाच्या चेअरमन पदी सुनिल सहदेव माळी यांची निवड झाली आहे, अशी माहिती स्वरुप पुणेकर यांनी दिली आहे.
    ऑल महाराष्ट्र टेंट डिलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या पदाधिकार्यांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी महापौर सागर भाई चव्हाण यांची महाराष्ट्र टेंट डिलर्स ऑर्गनायझेशनच्या चेअरमन पदी निवड झाली आहे. तर सुनिल माळी यांची पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागाच्या चेअरमन पदी निवड झाली. या नुतन पदाधिकार्यांचे असोसिएशनचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष स्वरूप (भैय्या) पुणेकर, खानापूर विभाग अध्यक्ष दयानंद बनसोडे, उपाध्यक्ष हणमंत कुंभार, सचिव शंकर सकटे आणि खानापूर विभागाचे सचिव प्रविण गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.
.........................
व्यवसायिकांच्या समस्या
सोडवण्यास प्राधान्य ....
महाराष्ट्र टेंट डिलर्स ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून राज्यभरातील मंडप, लाईट, फ्लॉवर, डेकोरेटर्स व्यवसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. तसेच राज्यभरातील संघटना अधिक बळकट व एकसंघ करणार आहोत.
सागर चव्हाण ( माजी महापौर)
चेअरमन, ऑल महाराष्ट्र टेंट डिलर्स
ऑर्गनायझेशन.


 

Post a Comment

0 Comments