Daily Mahasatta

Daily Mahasatta

जतमध्ये ऋषी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी

जत ( सोमनिंग कोळी)
       
जतमध्ये रामायण महाकाव्याचे रचनाकार ऋषी वाल्मिकी यांची जयंती आद्यकवि महर्षी वाल्मिकी मित्र मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली. आद्यकवी आणि रामायणाचा रचनाकर्ता असलेल्या महर्षी वाल्मीकि यांचा जन्म अश्विन पौर्णिमेला झाल्याचे मानले जाते. त्या परंपरे प्रमाणे शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२० रोजी जत शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी वाल्मीकि जयंती साजरी करण्यात आली.
       यावेळी माजी नगरसेवक महादेव कोळी, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष अशोक कोळी , पवन कोळी, आदर्श शिक्षक चंद्रकांत कोळी, महसूल विभागाचे सुभाष कोळी, दलित पँथरचे नेते बांधकाम सभापती भुपेंद्र कांबळे, अनिल कोळी, कृषी विभागाचे बी. टी. कोळी, सोमनिंग कोळी, शिवराज कोळी यांच्यासह समाजातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते. प्रारंभी ऋषी वाल्मिकी यांच्या फोटोला पुष्पाहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते चंद्रकांत कोळी, पत्रकार सोमनिंग कोळी यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
        मंडळाचे अध्यक्ष बी. टी कोळी यांनी आपल्या भाषणातून ऋषी वाल्मिकी यांनी केलेल्या कार्याची व शिकविणीविषयी माहिती सांगितली. वाल्मीकिंचे आई आणि वडील त्याला एका किराताजवळ ठेवून तपश्चर्येला निघून गेल्यावर तो लूटमारीचा धंदा करू लागला. त्याचे नाव ‘वाल्या’ पडले व सर्व लोक त्याला ‘वाल्या कोळी’ म्हणू लागले. त्याने एकदा काही ऋषींना घेरले. परंतु, त्या ऋषींनी त्याला उपदेश केला. त्याच्या जीवावर चैन करणारे त्याचे कुटुंबीय त्याच्या पापात वाटेकरी होतात काय, असे विचारून येण्यास सांगितले. कोणीही जेव्हा तयार होईना, तेव्हा त्यास उपरती झाली. बसल्या जागी त्याने ऋषींनी दिलेल्या राममंत्राचा जप सुरू केला. त्याच्या अंगाभोवती वल्मीक म्हणजे वारूळ निर्माण झाले. त्यामुळे त्यांना पुढे ‘वाल्मीकि’ असे नाव मिळाले, असे माहिती कोळी यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments