Daily Mahasatta

Daily Mahasatta

पूरग्रस्तांसाठी आरपीआयचा पलूस तहसीलवर भव्य आक्रोश मोर्चा

फेरसर्वे केलेले ९५ हजार १०० जमा करा अन्यथा येणाऱ्या काळात उग्र आंदोलन करू : विशाल तिरमारे
----------------------------------------
पलूस (अमर मुल्ला)
        रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पलूस कडेगांव विधानसभा पक्षाच्या वतीने पलूस तहसीलदार कार्यालयावर पूरग्रस्तांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी आरपीआय चे पलूस कडेगांव विधानसभा अध्यक्ष विशाल तिरमारे यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विरोधात आक्रोष मोर्चा काढण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व पूरग्रस्त नागरिक यांच्या वतीने पलूस चे तहसीलदार राजेंद्र पोळ यांना निवेदन देण्यात आले.
        मोर्चास उद्देशून बोलताना विशाल तिरमारे म्हणाले की, पूरग्रस्त नागरिक गेली एक-दिड वर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मागील महायुती सरकारने पूरग्रस्तांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी मोठ्या पॅकेज ची घोषणा करून सर्वांना न्याय देण्याचे प्रामाणिक काम केले. परंतु महाविकास आघाडी सरकारने जनसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे. तालुक्यातील पूरग्रस्त जनतेचे ९५ हजार १०० रु बुडविण्याचे धोरण शासन व प्रशासनाचे आहे की काय अशी शंका सामान्य नागरिकांच्या मध्ये निर्माण झाली आहे. त्याचाच भाग म्हणून हा भव्य मोर्चा तहसीलदार कार्यालयावर आलेला आहे. मोर्चाची दखल घेऊन तात्काळ पूरग्रस्तांचे अर्ज निकाली न काढल्यास आरपीआय पक्षाच्या वतीने येणाऱ्या काळात उग्र आंदोलन करू असा इशारा विशाल तिरमारे यांनी दिला.
       यावेळी आरपीआय व पूरग्रस्त नागरिक यांच्यावतीने उत्तरप्रदेश येथील मनीषा वाल्मिकी या युवतीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आरपीआय चे माजी जिल्हाध्यक्ष महादेवराव होवाळ, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा छायादीदी सरवदे, पलूस तालुका उपाध्यक्ष शितल मोरे, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रसाद शिखरे, आरपीआय खानापूर तालुका अध्यक्ष दादासाहेब चंदनशिवे, जिल्हा उपाध्यक्ष संजय मस्के, युवक खानापूर तालुका अध्यक्ष स्नेहलकुमार कांबळे यांची भाषणे झाली. मोर्चात मिरज तालुका उपाध्यक्ष सतीश सरवदे, मुस्लिम आघाडी कडेगांव तालुका अध्यक्ष दस्तगीर फकीर, बुर्ली शाखा अध्यक्ष अभिजित कांबळे, दुधोंडी शाखा अध्यक्ष वैभव तिरमारे, अक्षय तिरमारे यांच्यासह मोर्चास तालुक्यातील शेकडो पूरग्रस्त महिला व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments