Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्य कोरोना मुक्तीकडे, रविवारी केवळ १२६ पाॅझीटीव्ह

सांगली (राजेंद्र काळे)

       सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या वाढीला अटकाव घालण्यात प्रशासनाला मोठे यश आल्याचे दिसून येत आहे. गेल्या पंधरा वीस दिवसात दोनशे ते तीनशेच्या आसपास कोरोनाग्रस्तांची होणारी वाढ आज रविवार ता. १८ रोजी चक्क १२६ वर आल्यामुळे सांगली जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे सुरु झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
       सांगली जिल्ह्यात गेल्या सात ते आठ महिन्यात कोरोनाचा कहर सुरुच होता. मात्र ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाच्या वाढीचा वेग कमी होत निघाला आहे. दररोज एक हजार पेक्षा अधिक रुग्ण वाढीचा वेग मंदावला असून तो ऑक्टोबर महिन्यात दोन- तीनशे पर्यंत खाली आला आहे. आज रविवार ता. १७ रोजी तर चक्क १२६ रुग्ण पाॅझीटीव्ह आले आहेत. अनेक ठिकाणची कोव्हीड सेंटर देखील बंद करण्यात येत आहेत. प्रशासनाचे प्रयत्न आणि त्याला मिळालेली नागरिकांची साथ यामुळे सांगली जिल्ह्या कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे.
       आज रविवार ता. १८ रोजी जिल्ह्यात केवळ १२६ रुग्ण पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक २७ रुग्णांचा समावेश आहे. सांगली शहरात १८ तर मिरज शहरात ९ रुग्ण पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत. तसेच आटपाडी- १९,  जत- ६ कडेगाव- ९,  कवठेमंहकाळ- ४,  खानापूर- ८,  मिरज- ९,   पलूस-१४  शिराळा- ०० तासगाव- १५ आणि  वाळवा -१५ रुग्णांचा समावेश आहे.

        सांगली जिल्ह्यात आज अखेर ४२ हजार ८५८ रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत. यापैकी ३८ हजार ५४५ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. सद्या २ हजार ७३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आज पर्यंत १ हजार ५७६ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आज दिवसभरात ४२९ रुग्णानी कोरोना वर मात केली आहे. रुग्ण संख्या अशीच कमी झाल्यास येणारी दिवाळी सर्वांनाच सुखाची आणि समृद्धीची जाणार हे निश्चित.  

Post a Comment

0 Comments