मंत्री विश्वजीत कदम यांनी शेतातील बांधांवर जाऊन केली नुकसानीची पहाणी

 कडेगाव : (संदीप कुलकर्णी) 
राज्याचे कृषी व सहकार मंत्री डॉक्टर विश्वजीत कदम सध्या कडेगाव पलूस मतदार संघाच्या दौर्‍यावर आहेत. आज त्यांनी कडेगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पाहणी करण्यासाठी खेराडे विटा या गावचे रहिवासी असलेल्या शहाजी घागरे यांच्या शेतातील कार्ले व टोमॅटो या पिकांची बांधावर जाऊन पाहणी केली.
यावेळी राज्याचे कृषी व सहकार मंत्री विश्वजीत कदम यांच्यासोबत युवा नेते जितेश भैया कदम तसेच शांताराम बापू कदम व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच त्यांनी आज कडेगाव येथे आढावा बैठक घेऊन महावितरण सार्वजनिक बांधकाम, सहकार, आरोग्य ताकारी टेंभू योजना ग्राम विकास या विभागाच्या काही समस्या त्यांच्या समोर आल्यानंतर त्यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्या सोडण्याचे आदेश दिले. काही अन्य समस्या संदर्भात येत्या काही दिवसात मुंबई येथे संबंधित खात्याचे मंत्री सचिव यांच्यासोबत बैठक घेऊन त्या सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहीन असे डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले. यावेळी कडेगाव प्रांत तहसीलदार व इतर खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

 


 

Post a comment

0 Comments