Daily Mahasatta

Daily Mahasatta

विश्वासराव नाईक कारखान्याने ऊसतोड मजुरांसाठी उभारलेले कोव्हीड सेंटर आदर्शवत : प्रांताधिकारी नागेश पाटील

शिराळा ( राजेंद्र दिवाण)
         
: विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याने कामगार, तोडणी व वाहतूक कामगारांसाठी कोव्हीड सेंटर उभारून आदर्शवत काम केले आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी नागेश पाटील केले.
          भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक सेवा केंद्रात कारखान्याने उभारलेल्या कोविड सेंटरच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानी, तर युवा नेते विराज नाईक प्रमुख उपस्थित होते.
प्रांताधिकारी पाटील म्हणाले, कोरोना विषाणूचा धोका अजून पूर्णपणे गेलेला नाही. प्रत्येकाने काळजी घेणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करणे व वरचेवर स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. आमदार मानसिंगराव नाईक यांनी मदारसंघातील लोकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. कोरोना काळात मोठे काम केले आहे. मंत्री जयंतराव पाटील व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे सतत पाठपुरावा करून अनेक सोई-सुविधा उपलब्ध करून घेतल्या आहेत. कारखाण्याचे कर्मचारी, तोडणी व वाहतूक कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोविड सेंटरची उभारणी केली असून त्याचे उदघाटन आज झाले.
         आमदार नाईक म्हणाले, कारखाण्याकडे सुमारे चार हजार तोडणी व वाहतूक कामगारांची यंत्रणा येऊ लागली आहे. त्यांचे आरोग्य सदृढ, निरोगी राहावे व त्यांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये, यासाठी योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. सर्वांची टप्याटप्याने आरोग्य तपासणी करण्यात येईल. कारखाना चालू काळात कोणाला कोरोनाची लागण झाली तर, त्याच्यावर या सेंटरमध्ये उपचार होतील. राज्य शासन व साखर आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार २५ खाटांच्या कोविड सेंटरची उभारणी केली आहे. येथे ऑक्सिजन बेडची व्यवस्था आहे.
         प्रारंभी कार्यकारी संचालक राम पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शेती अधिकारी विठ्ठल चव्हाण यांनी प्रास्ताविकात तोडणी व वाहतूक यंत्रणेची माहिती दिली. प्रांताधिकारी पाटील यांच्या हस्ते फीत कापून कोविड सेंटरचे उद्घाटन झाले. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी प्रवीण पाटील, सचिव सचिन पाटील, डॉ. विक्रमसिंह गावडे, कारखाण्याचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
. . . . . . . . . . . . . . . . . .

Post a Comment

0 Comments