Daily Mahasatta

Daily Mahasatta

दिग्विजय (भैय्या) कदम यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा...


: कडेगाव तालुक्यातील शासकीय कार्यालयाना सॅनिटायझर मशिनचे वाटप करताना तहसीलदार शैलजा पाटील, सौ. स्मिता महिंद, सागर सुर्यवंशी व अन्य.

कडेगाव ( सचिन मोहिते)
        मा. शांताराम (बापू) कदम ,(चेअरमन- सागरेश्वर सह. सुतगिरणी मर्या. कडेगांव) यांचे चिरंजीव दिग्विजय (भैय्या) कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कडेगांव तहसिलदार कार्यालय येथे सर्व शासकीय कार्यालये, कोरोना हॉस्पीटल्स, प्राथमिक आरोग्य केंद्र इ. ठिकाणी स्वयंचलित सॅनिटायझर मशिन, फळे इत्यादींचे वाटप करण्यात आले.
      कडेगांवच्या  तहसिलदार सौ. शैलजा पाटील, पंचायत समिती सदस्या सौ. स्मिता महिंद, नगरसेवक- सागर सुर्यवंशी यांचे शुभहस्ते शासकीय कार्यालयाना सॅनिटायझर मशिनचे वाटप  करणेत आले. यावेळी स्वागत व प्रास्ताविक सयाजी जाधव (जनसंपर्क अधिकारी  डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सह. सा. का. लि., वांगी)  यांनी केले.
       यावेळी बोलताना तहसिलदार सौ. शैलजा पाटील म्हणाल्या, वाढदिवसानिमित्त डिजीटल, जाहिराती, केक इ. गोष्टीवर होणाऱ्या खर्चास फाटा देवून मा. दिग्वीजय कदम यांचे वाढदिवसांनिमित्त तालुक्यातील सर्व युवक कार्यकर्त्यानी स्वयंचलित सॅनिटायझर मशिन, मास्क व फळेवाटप तसेच शहरात व गावांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषध फवारणी केली आहे.  हा स्तुत्य असा उपक्रम राबविला तो अतिशय अभिमानास्पद आहे.
       याप्रसंगी विकास पवार(सरपंच निमसोड), सुरज मुळीक, सत्यजीत मोरे, अनिकेत मोहिते, सोमनाथ करांडे, शंभूराजे पवार, अभिजीत लाड, रोहित जाधव, अजय शिंदे, ऋषीकेश माने, ईराप्पा कोळी आदी युवक कार्यकर्ते उपस्थित होते. विजय मुळीक (उपाध्यक्ष, युवक काँग्रेस (आय.) कमिटी कडेगांव यांनी आभार मानले. 
 

Post a Comment

0 Comments