Daily Mahasatta

Daily Mahasatta

लेंगरे पोलीस पाटील पुष्पा बोबडे यांचे निलंबन रद्द करा : सिंहसेनेची मागणी

विटा : विविध राजकीय पक्ष आणि संघटनेचे पदाधिकारी भेटून पुष्पाताई बोबडे यांच्या ठिय्या आंदोलनास पाठींबा देत आहेत.

विटा ( मनोज देवकर )
       लेंगरे येथील महिला पोलीस पाटील सौ.पुष्पा बोबडे यांचे निलंबन रद्द करावे, अशी मागणी सिंहसेनेचे प्रमुख शिवभैय्या शिंदे यांच्यासह विविध संघटनानी प्रशासनाकडे केली आहे. या मागणीसाठी विटा तहसीलदार कार्यालयासमोर दहा दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे.
        लेंगरे गावच्या महिला पोलीस पाटील सौ. पुष्पा बोबडे यांना विटा प्रांताधिकारी यांनी दोन महिन्यांकरिता निलंबित केले आहे. सदर कारवाई राजकीय दबावापोटी झाल्याचा आरोप करत पुष्पा बोबडे व सिंह सेनेचे शिवभैय्या शिंदे विटा तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहेत. आंदोलनास मनसेचे साजिद आगा , प्रहार चे आकाश शिंदे , राजे प्रतिष्ठान चे सांगली जिल्हाध्यक्ष मोशीन मुजावर यांनी पाठिंबा दिला आहे.
पुष्पा बोबडे या पोलीस पाटील म्हणून कामकाज चांगले करतात की नाही? याची पारदर्शक व निष्पक्ष शहानिशा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. 

Post a Comment

0 Comments