Daily Mahasatta

Daily Mahasatta

फौजी व पोलिस ब्रदर्स यांच्यावतीने इस्लामपूरात रक्तदान शिबिर


वाळवा ( रहिम पठाण)
           सांगली जिल्ह्यातील फौजी व पोलीस ब्रदर्स यांच्या माध्यमातून उद्या  2 ऑक्टोबर रोजी इस्लामपूर येथे महात्मा गांधीजी जयंतीचे निमित्त साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे. इस्लामपूर येथील निर्मला सांस्कृतिक हॉल येथे सकाळी 10 ते 5 पर्यंत हे शिबिर आयोजित केलेले आहे.
      सकाळी इस्लामपूर विभागाचे पोलिस उपअधिक्षक मा. श्री. कृष्णात पिंगळे (साहेब) व डॉक्टर अभिनंदन मोरे ऊडान फाऊंडेशन क्षेत्रीय फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराची सुरवात होईल. कोरोनाच्या या संकटात आपले राष्ट्रीय कर्तव्य मानून जास्तीतजास्त लोकांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. 


 

Post a Comment

0 Comments