Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

कडेगाव तालुक्यात वीज पडून महिला ठार


नेर्ली/ कडेगाव गाव (संदीप कुलकर्णी)
         शेतात कामासाठी गेलेल्या महिलेचा अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना कडेगाव तालुक्यातील सोहोली येथे शनिवारी (दि.10) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली.श्रीमती रत्नाताई अंकुश कदम (वय 52 वर्ष) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे
        याबाबत अधिक माहिती अशी, श्रीमती रत्नाताई कदम ही महिला सोहोली गावापासून जवळच असलेल्या गव्हळ नावाच्या शेतात कामासाठी गेली होती.आज दुपारी अचानक मोठा पाऊस सुरू झाला. यावेळी अचानक वीज तिच्या अंगावर पडली. त्यामुळे श्रीमती रत्नाताई अंकुश कदम यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याबाबत तपास पोलीस नाईक प्रवीण पाटील करीत आहेत.

Post a Comment

0 Comments