Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगलीत ' चिन्मय सागर कोरोना वॉरिअर नॅशनल अवॉर्ड २०२० चे वितरण : माजी महापौर सुरेश पाटील


: मुनिश्री चिन्मय सागरजी महाराज यांच्या प्रथम स्मृतिदिन प्रीत्यर्थ पुरस्कार सोहळा
सांगली ( प्रतिनिधी ) 
चिन्मय सागर चॅरिटेबल ट्रस्ट व वर्ल्ड जैन डॉक्टर्स फोरम यांच्या संयूक्त विद्यमाने मानवतावादी दृष्टिकोनातून कोरोना संक्रमण कालावधीत ज्या सामाजिक संस्था, डॉक्टर्स, समाजसेवक, सन्मानीय मान्यवरांनी आप-आपल्या स्तरावर कोरोनाशी लढा देत रुग्णांची सेवा केली. त्या कोरोना योद्धांचा सत्कार म्हणून त्यांना राष्ट्रीय पातळीचा “चिन्मय सागर कोरोना वॉरिअर नॅशनल अवॉर्ड २०२०” देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
     हा पुरस्कार समारंभ रविवार दि. १८ ऑक्टोंबर २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता राजमती भवन नेमीनाथनगर सांगली येथे आरोग्य राज्यमंत्री मा. नामदार राजेंद्र यड्रावकर यांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे. याप्रसंगी चिन्मय सागर चॅरिटेबल ट्रस्ट चे चेअरमन सुमन लता जैन, सेक्रेटरी अभिषेक मोदी आणि वर्ल्ड जैन डॉक्टर्स फोरम चे अध्यक्ष डॉ. सन्मती थोले उपस्थित राहणार असल्याचे माहिती सांगलीचे माजी महापौर व मुनिश्री चिन्मय सागर चॅरिटेबल ट्रस्टचे संयोजक सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ते म्हणाले, सध्या वैश्विक स्तरावर कोरोना महामारी चे संक्रमण सर्वत्र पोहचत असताना भारतामध्ये ही याचा कहर सुरु आहे. अशावेळी कोरोनाशी लढा देण्यासाठी शासन आपल्या परीने सर्व स्तरावर प्रयत्न करीत आहे. तरी समाजातील विविध सामाजिक संस्था, संघटना, सन्मानीय व्यक्ती, डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णालयातील साफ-सफाई कर्मचारी हे आप-आपल्या क्षमतेने कोरोनाशी दोन-हात करून लढा देत आहेत.
    चिन्मय सागर कोरोना वॉरिअर नॅशनल अवार्ड 2020 प्राप्त व्यक्तींची नावे : डॉ. अभिजित चौधरी (जिल्हाधिकारी सांगली), मा. श्री. नितीन कापडणीस (आयुक्त सां. मि. कु. महानगरपालिका ) श्री. सुरेश पाटील (माजी महापौर) डॉ. सोमशेखर पाटील, डॉ. भरत मुडलगी, डॉ. जयधवल भोमाज, डॉ. महाधवल (मोहन) भोमाज, डॉ. शरद देसाई, डॉ. उमेश पाटील
    चिन्मय सागर कोरोना वॉरिअर अवार्ड 2020 प्राप्त व्यक्तींची नावे : श्री. सतीश साखळकर, श्री. संजय बेले, श्री. असिफ बावा, हयात फाउंडेशन, श्री. पीर अली पुणेकर, श्री. डॉ. ताटे, दक्षिण भारत जैन सभा, श्री. अमोल पाटील, श्री. तानाजी पाटील, श्री. शशिकांत पाटील, श्री. राकेश दड्डांन्वर, डॉ. भूपाल गिरीगोसावी, डॉ. संजय साळुंखे, श्री. अभिजीत भोसले, डॉ. आंबोळे.
या सर्व कोरोना योद्धांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने सदर राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार सोहळा सांगलीत संपन्न होत आहे. तरी या समारंभास सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन सुरेश पाटील यांनी केले आहे.
 

Post a Comment

0 Comments