विट्यात ८ रुग्ण पॉझिटिव्ह
विटा ( मनोज देवकर )
खानापूर तालुक्यात आज ३१ रुग्णांच्या कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. विट्यात 8 जणांच्या कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. बेनापूर येथील ७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
लेंगरे येथील ५ , बामणी येथील ४ , देवीखिंडी व पळशी येथील प्रत्येक दोन रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. आळसंद , मेंगाणवाडी व सुलतान गादे येथील प्रत्येकी एक रुग्ण आज पॉझिटिव्ह आले आहेत.
मृतांची संख्या ५९ झाली असून १५८२ रुग्ण बरे झाले आहेत.आजवर कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची संख्या २१०६ झाली आहे. ४६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
0 Comments