Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

खानापूर तालुक्यात कोरोनाने आजअखेर ५१ जणांचा बळी, आज ३१ नवीन पाॅझीटीव्ह रुग्ण

विटा (राजेंद्र काळे)
         खानापूर तालुक्यात आजअखेर एकूण १८४० रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आले असून यापैकी ११९९ रुग्णानी  कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे तर ५१ रुग्णांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू  झाला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ अनिल लोखंडे यांनी दिली आहे.
         खानापूर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश येत आहे. दररोज सुमारे ६० ते ७० च्या सरासरीने होणारी कोरोनाग्रस्तांची वाढ सध्या कमी झाली असून आता दिवसाला पंचवीस ते तीस च्या सरासरीने रुग्ण वाढत आहेत. आज दिवसभरात खानापूर तालुक्यातील ३१ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये विटा शहरातील सर्वाधिक १९ रुग्णांचा समावेश आहे. तर देविखिंडी २, भिकवडी खुर्द २ , हिंगणगादे ५, नागेवाडी १, गोरेवाडी १ आणि कलेढोण १ असे दिवसभरात तालुक्यातील ३१ रूग्ण पाॅझीटीव्ह आले आहेत. 

Post a comment

0 Comments