Daily Mahasatta

Daily Mahasatta

समाज कल्याण शिष्यवृत्तीबाबत शिक्षक भारतीचा पाठपुरावा सुरूच : महेश शरनाथे

सांगली (प्रतिनिधी)
      समाज कल्याण शिष्यवृत्ती बाबत शिक्षकांना येणाऱ्या अडचणींबाबत शिक्षक भारती सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे यांनी सांगितले.
       शिक्षक भारती सरचिटणीस कृष्णा पोळ यांनी समाजकल्याण अधिकारी राधाकिशन देवढे यांना दिलेल्या निवेदनानुसार काल जिल्हा परिषद मध्ये बैठक संपन्न झाली. काल पुन्हा शिक्षक भारतीच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला. शिक्षक भारतीच्या वतीने समाज कल्याण कक्ष अधिकारी सुजित भांबूरे यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष शरणाथे, सरचिटणीस कृष्णा पोळ व नितांत तांबडे उपस्थित होते.
       शिष्यवृत्तीच्या कामकाजासाठी जातीचा दाखला तहसीलदार यांच्याकडून घ्यावा लागतो. तो लवकरात लवकर मिळणेबाबत तालुकास्तरावर सांगण्यात येईल. फॉर्म भरण्यासाठी ची मुदत 27 नोव्हेंबर पर्यंत वाढलेली आहे. बँकेची खाती झिरो बॅलन्सवर मिळतील, तसेच खात्यावर ६ महिने व्यवहार न झाल्यास ती खाती बंद होतात याबाबतही बँकांना सुचित करण्यात येणार आहे. फाॅर्म ची मागणी एक्सेल शीट मध्ये केलेली आहे. जिल्हास्तरावरून एकच फॉरमॅट व एक्सेल शीट फॉर्म देण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. स्कॉलरशिप निहाय कागदपत्रे जमा करण्याबाबतची माहिती दिली जाईल तसेच निकष व त्यांची यादी फॉर्मसोबत दिली जाईल. मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर जमा होत असतात. त्यामुळे त्या बाबतची माहिती शाळांना मिळत नसते म्हणून मंजूर शिष्यवृत्ती मुलांची यादी ही प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली त्यालाही मान्यता देण्यात आली.
        उत्पन्नाचा दाखला व जातीचा दाखला यामध्ये बदलाबाबत समाजकल्याण आयुक्त यांचेकडे मार्गदर्शन मागितले आहे. याबाबत शासन स्तरावर आमदार कपिल पाटील यांच्या वतीने पाठपुरावा केला जाईल असेही शरनाथे यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments