सांगलीच्या शामरावनगर मध्ये साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावू : संजय बजाज

सांगली : शामराव नगर मधील समस्या समजून घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज.

सांगली, (राजेंद्र काळे)
    शामरावनगरमध्ये साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू अशी ग्वाही राष्ट्रवादीचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज यांनी आज येथे दिली. पालकमंत्री जयंत पाटील उद्या शनिवारी शामरावनगरला भेट देऊन या समस्येची पाहणी करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
परवाच्या वादळी पावसामुळे शामरावनगर भागात प्रचंड प्रमाणात पाणी साचले आहे. जवळपास पाचशेहून अधिक घरांमध्ये पाणी शिरले असून येथील नागरिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. अजूनही या भागातले पाणी हटत नाही. या ठिकाणांची पाहणी करून श्री. बजाज यांनी नागरिकांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
    शामराव नगर मध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाणी साचून बिकट परिस्थिती निर्माण होते, त्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते. हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरता आपण जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंत पाटील यांच्याकडे प्रयत्न करू असे श्री. बजाज यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्ते व नागरिकांनी भागातील समस्या मांडल्या. या पाहणीच्या वेळी राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष राहुल पवार, आयुब बारगीर उपस्थित होते. 

Post a comment

0 Comments