Daily Mahasatta

Daily Mahasatta

सावधान...कडेगाव तालुक्यात पुन्हा कोरोना वाढतोय

कडेगाव ( संदीप कुलकर्णी)
       आज सलग दुसऱ्या दिवशी कडेगाव तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. आज कडेगाव तालुक्यात चिंचणी- 5 देवराष्ट्रे- 2 कडेगाव - 2, कडेपुर- 4, नेवरी - 2, रामपूर - 2, रायगाव - 1, शिवनी - 2, सोनकिरे - 11, वांगी - 2 असे एकूण 24 रुग्ण पॉझिटिव आले.
        कडेगाव तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून कोरोना पॉझिटिव रुग्णांच्या संख्येत घट दिसत होती. त्यामुळे कडेगाव शहरासह तालुक्यात आनंदाचे वातावरण होते. परंतु मागील दोन दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यासंदर्भात कडेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ आशा चौगुले यांच्या सोबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, गेल्या दोन दिवसांपासून आपण टेस्टिंग चे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे.

      वाळवा तालुक्यात नऊ लाखांचा गुटखा जप्त  

     टेस्टिंगमुळे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना आपण योग्य ती ट्रीटमेंट देऊन होम आयसोल्युशन मध्ये ठेवत आहोत. त्यामुळे लोकांच्या संपर्कात येण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. येत्या काही दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी येईल तसेच येत्या दोन ते तीन दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेने घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे व सोशल डिस्टंसिंग मास्क याचा नियमित वापर करावा तसेच कोरोना आजाराची काही लक्षणे दिसताच जवळील अाशा सेविका तसेच आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आव्हान कडेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा चौगुले यांनी केले

Post a Comment

0 Comments