पलूस मध्ये दारू नको, दूध प्या उपक्रम : प्रशांत लेंगरे


पलुस (अमर मुल्ला)
       शुक्रवार दिनांक 30 रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दारू नको दूध प्या हा अनोखा उपक्रम शिवसेना पलूस तालुक्याच्या वतीने वार्ड क्रमांक 1 मध्ये घेण्यात आला, अशी माहिती शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे यांनी दिली.
       लेंगरे म्हणाले, आजची पिढी वाईट व्यसनाच्या नादी लागून बरबाद होत चाललेली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य व्यापारी असतील, शेतकरी असतील, नोकरदार वर्ग फार काबाडकष्ट करून त्या ठिकाणी आपला प्रपंच चालवत असतात. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात आणि अशा वेळी आपल्या घरातील एखादा तरुण मुलगा जर वाईट व्यसनाला लागला वाईट संगतीला लागला तर ते पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असते, असे घडू नये म्हणून शिवसेना पलुस तालुक्याच्या वतीने आजच्या कोजागिरी पौर्णिमेचे दारू नको दूध प्या हा उपक्रम घेण्यात आला.
       काही युवकांनी आजपासून संकल्प केला. भविष्यामध्ये कधीही चुकीच्या मार्गाला न जाता. आपलं कुटुंब आपला परिवार पूर्णपणे निर्व्यसनी करून सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. यावेळी महिलांचा खुप मोठ्या प्रमाणावर समावेश होता. यावेळी माजी तालुकाप्रमुख प्रशांत लेंगरे, ओंकार पाटील, विशाल शिंदे,जगदीश पवार, प्रविण गलांडे, राहुल खंबाळे, पै. श्रीकांत लेंगरे, सागर येसुगडे सौ. स्नेहल लेंगरे, स्वाती लेंगरे, लक्ष्मी लेंगरे, समृध्दी डाळे, अजंली येसुगडे व नागरिक उपस्थित होते.. 


Post a comment

0 Comments