Daily Mahasatta

Daily Mahasatta

भारती दंत महाविद्यालयात दुभंगलेले ओठ व टाळुच्या मोफत शस्त्रक्रिया

: मानद संचालक डाॅ. एच. एम. कदम यांची माहिती

सांगली ( महेश रोकडे)
        येथील भारती दंत महाविद्यालयात दुभंगलेले ओठ व टाळुच्या मोफत शस्त्रक्रिया करण्याचा विभाग नव्याने चालू करण्यात आल्याचे भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डाॅ. एच.एम.कदम यांनी सांगितले.
      जर्मनी येथील डियुश किंडर हेल्पे व बेंगलोर येथील अखिल भारतीय महिला सेवा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्वतंत्र विभाग चालू करण्यात आला. आज समाजात जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळुच्या आजाराने बरेच लोक पिडीत आहेत. अशा लोकांवर शस्त्रक्रिया करून त्यांचे मुखव्यंग पुर्ण बरे होवू शकते. समाजात याची जनजागृती होणे आवश्यक असल्याची माहिती या विभागाचे प्रमुख डाॅ. अमित बसण्णावार यांनी दिली.
        या शस्त्रक्रियेसाठी आता पुणे, मुंबईत जाण्याची गरज नसून भारती हॉस्पिटलमध्ये याची सोय झाली आहे. आजपर्यंत बाराजणांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासाठी दंत महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. विद्या दोडवाड यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments