Daily Mahasatta

Daily Mahasatta

' यशवंत शुगर ' मुळे शेतकर्यांच्या जीवनात समृद्धी येईल : खास संजयकाका पाटील

नागेवाडी : यशवंत शुगर कारखान्याच्या बाॅयलर प्रज्वलन प्रसंगी परमपूज्य पारसनाथ महाराज, आनंदगिरी महाराज यांच्यासह खा. संजय काका पाटील, प्रतापशेठ साळुंखे, अशोकराव गायकवाड, निवृत्त सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख, शंकर नाना मोहिते व अन्य.

विटा (मनोज देवकर)

        यशवंत शुगर कारखान्यामुळे परिसरातील शेतकरी आणि कामगारांच्या जीवनात भरभराट येईल.  आपल्या सर्वांच्या सहकार्याने गळीत हंगामास सुरवात करत आहोत. कारखान्याच्या माध्यमातून परिसराच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असा विश्वास खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केला.

        नागेवाडी ता. खानापूर येथील यशवंत अॅण्ड पाॅवर लिमिटेड या कारखान्याचा बाॅयलर प्रज्वलन सोहळा परमपुज्य पारसनाथ बाबा यांच्याहस्ते आणि खासदार संजयकाका पाटील यांनी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी निवृत्त सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख, शिवप्रताप उद्योग समुहाचे प्रतापशेठ साळुंखे, मनमंदीर उद्योग समुहाचे अशोकराव गायकवाड, शंकर नाना मोहिते, विजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

        खासदार संजयकाका म्हणाले, यशवंत कारखान्याच्या परिसराने आजपर्यंत सर्वोच्च समृद्धी आणि भरभराटीचे दिवस पाहिले आहेत. आता पुन्हा एकदा या माळरानावरून परिसराच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी आणि सभासद यांनी विश्वासाने जास्तीतजास्त ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे. यावर्षी यशवंत शुगर परिसरातील कारखान्यांच्या बरोबरीने शेतकर्यांना ऊसाचा दर देईल, अशी ग्वाही खासदार संजयकाका पाटील यांनी दैनिक महासत्ताशी बोलताना दिली. 

           या कार्यक्रमास कार्यकारी संचालक आर. डी. पाटील, जनरल मॅनेजर अमर जगताप, चिफ इंजिनिअर उमाकांत तावरे, चिफ केमिस्ट समाधान  गायकवाड, सिव्हील इंजिनिअर बाळासाहेब शिंदे, सिनियर इंजिनिअर शैलेश पाटील, असिस्टंट इंजिनिअर अक्षय औताडे, केमिस्ट धैर्यशील शितोळे, बाॅयलर अटेंडट मधुकर गोड, दशरथ पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

...................................

सर्व पक्षीय नेतेमंडळीची

' एकत्रित मोळी ' बांधण्यात यश..

     : यशवंत शुगरच्या बाॅयलर प्रज्वलनाच्या सोहळ्यास जेष्ठ नेते प्रतापशेठ साळुंखे, अशोकराव गायकवाड, शंकर नाना मोहिते  यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र कांबळे, राजुशेठ जानकर, संग्राम माने, शिवसेना तालुकाध्यक्ष सतिश निकम तसेच माहुलीचे संग्राम देशमुख, सुबराव निकम यांच्यासह विविध गावचे सरपंच उपस्थित होते. एकंदरीतच पक्षभेद बाजूला ठेवून यशवंत कारखाना पुन्हा जोमाने सुरू करण्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी विविध राजकीय पक्षातील नेते आणि कार्यकर्ते यांची एकत्रित ' मोळी ' बांधल्याचे समाधानकारक चित्र कारखान्याच्या प्रांगणात दिसून आले.

नागेवाडी : यशवंत शुगर कारखान्याचा सन २०२०- २१ या वर्षाचा बाॅयलर अग्नी प्रज्वलन सोहळा परमपूज्य पारसनाथ महाराज आणि आनंदगिरी महाराज यांच्याहस्ते पार पडला. 

 

Post a Comment

0 Comments