Daily Mahasatta

Daily Mahasatta

तुम्ही विकासकामे सांगा, आम्ही निधी मिळवून देऊ : महेंद्रआप्पा लाड

पलूस : भूमिपूजन समारंभ प्रसंगी महेंद्र आप्पा लाड, विजय पवार, पोपट पाटील , सरपंच अलका दिवाण, उपसरपंच विजया जाधव, अशोक कदम.

पलुस (अमर मुल्ला)
       कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद दूर करून विकास कामाकडे लक्ष द्यावे. तळागाळातील सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन या कामांसाठी पाठपुरावा करून पुढाकार घ्यावा. तुम्ही आम्हाला विकास काम दाखवा, आम्ही तुम्हाला निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांनी दिली.
        राज्यमंत्री डाॅ. विश्वजीत कदम साहेब यांच्या निधीतून आलेल्या विविध विकास कामांचे पलुस तालुक्यातील आंधळी येथे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी महेंद्र आप्पा लाड बोलत होते.
‌‌ जिल्हा परिषद सांगली, पंचायत समिती पलूस व ग्रामपंचायत मधील 14 वित्त आयोग निधीतून चार कामे, आमदार फंडातून एक तसेच पंचवीस पंधरा चे एक अशी कामे मंजूर आहेत. यामध्ये हरिजन वस्ती ते चावडी डांबरीकरण रस्ता, नवीन वसाहत येथील कॉंक्रीट रस्ता , मोराळे कॉर्नर आर. सी. सी. गटारी, अंगणवाडी नंबर 67 व 68 संरक्षक भिंत बांधणे,
अशी एकूण सहा कामे आंधळी गावच्या विकासासाठी मंजूर आहेत. या कामांचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.
         यावेळी बोलताना महेंद्र आप्पा लाड म्हणाले की राज्य मंत्री विश्वजित कदम साहेबांच्या माध्यमातून सार्वजनिक विकासकामांचे भूमिपूजन झाले. मंत्री साहेबांचे या मतदारसंघात विकास काम मोठ्या प्रमाणात चालू आहे तसेच राज्यात ही त्यांचे उठावदार काम आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या अडचणी समजून घेऊन विकास काम मोठ्या प्रमाणात पुढील काळात करणार आहोत. विकास कामापासून कोणतेही गांव या मतदार संघातील वंचित राहणार नाही. मतदार संघात देवस्थान कामासाठी तब्बल 27 कोटी रुपये मंजूर करून देण्यात आले आहेत. अजूनही विकास कामासाठी निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे काम करणार. विकासकामात कुठेही आपण कमी पडणार नाही. फक्त आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन काम करावे, असे आवाहन लाड यांनी केले.


         यावेळी बोलताना विजय पवार म्हणाले, कामाचा दर्जा खालावला नाही पाहिजे. सरपंच मॅडम यांचा कार्यकाल संपत आला असला तरी आम्ही नागरिक या कामांच्याकडे परिपूर्ण लक्ष देऊन चांगल्या दर्जाचे कामे गावात करून घेणार आहोत. त्यामुळे संबंधित ठेकेदारांनी पारदर्शक कामे करावीत. तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे ते रस्ते आमदार फंडातून अथवा दुसऱ्या कोणत्याही योजनेतून नवीन तयार करून मिळावेत अशी मागणी करण्यात आली.
सरपंच अलका दिवाण, उपसरपंच विजया जाधव,सदस्य भारती माने, विजय पवार, पोपट पाटील , सर्जेराव माने, अशोक कदम, बजरंग जाधव, अर्जुन माने, ग्रामसेवक श्रीमती एस. डी. पवार, पंचायत समिती पलूसचे शाखा अभियंता सुहास कांबळे व डेपोटी इंजिनिअर विजय वाघमारे तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments