Daily Mahasatta

Daily Mahasatta

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून प्रस्ताव सादर करावे : खास. धैर्यशील माने

पेठ : नुकसानग्रस्त शेतीची पहाणी करताना खास. धैर्यशील माने, युवा नेते सम्राट बाबा महाडिक व अन्य.
पेठ (रियाज मुल्ला)
        परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन प्रस्ताव शासनाला सादर करावे, अशी सुचना खास. धैर्यशील माने यांनी प्रशासनाला दिली आहे.
      खासदार धैर्यशील दादा माने व युवानेते मा. सम्राट बाबा महाडीक यांनी संयुक्तरित्या दौरा करत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिराळा व वाळवा  तालुक्यातील मांगले, कांदे, सागाव, शेखरवाडी, कार्वे, येडेनिपाणी  या नुकसान झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
     सांगली  जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, वाळवा तालुका व शिराळा तालुक्यात  या अतिवृष्टीने बऱ्याच शेतकऱयांचे अतोनात नुकसान झाल्याने  खासदार धैर्यशील माने व सम्राटबाबा महाडिक यांनी नुकसान ग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तात्काळ पंचनामे करून प्रस्ताव सादर करावा, कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. खचलेले रस्ते ,पुलांची तात्काळ दुरुस्ती आधी संदर्भात सूचना दिल्या.
       यावेळी  अभिजित पाटील निजाम मुलाणी जि. प. सदस्य,सौ. विदयाताई पाटील, अरविंद बुद्रुक, विठ्ठल गडकरी, सुमित पाटील, विजय गराडे, सागर दशवंत शुभंम पाटील, विजय पाटील, दिपक तडाखे, भिमराव गराडे, डॉ. सचिन पाटील, भानुदास मोटे, दादा पाटील, व  इतर मान्यवर उपस्थित होते. 


 

Post a Comment

0 Comments