Daily Mahasatta

Daily Mahasatta

..म्हणून विटा शहर आज अंधारात गेले : किरण तारळेकर

.
विटा ( मनोज देवकर)
         महापारेषणच्या कार्वे सबस्टेशनमधुन विटा शहरास कार्वे - विटा या ३३ केवि लाईनद्वारे वीजपुरवठा केला जातो. या लाईनचा तांत्रिक बिघाड झाला किंवा देखभाल दुरुस्तीसाठी हि लाईन बंद करावी लागली तर पर्याय म्हणुन कार्वे - आळसंद - विटा किंवा कार्वे-कडेगांव - विटा या ३३ केव्ही च्या दोन लाईन्स उपलब्ध आहेत. परंतु या दोन पर्यायी लाईन्स आणीबाणीच्या वेळी उपयोगी पडायच्या असतील तर या दोन्ही लाईन्स ची नियमीत देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक होते व नेमके याच देखभालीकडे विटा महावितरणने दुर्लक्ष केल्यामुळे आज शुक्रवार २३ आक्टोबर रोजी विटा शहर अंधारात ढकलले गेले आहे, असे परखड मत माजी उपनगराध्यक्ष किरणभाऊ तारळेकर यांनी व्यक्त केले आहे.
        तारळेकर म्हणाले, आज सायंकाळी कार्वे विटा ३३ केव्ही च्या लाईनवर तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पर्याय म्हणुन आळसंद लाईनवरुन विटा शहराचा वीजपुरवठा सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु सदर लाईनची नियमीत देखभाल नसल्याने व लाईन तंदुरूस्त नसल्याने काही वेळातच या लाईनवर पण तांत्रिक बिघाड झाला अन एन सनासुदीच्या दिवसामध्ये विटा शहर अंधारात बुडाले. कार्वे सबस्टेशनमधील महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी या लाईन्सची देखभाल करुन हि लाईन पर्याय म्हणुन व्यवस्थित ठेवण्याची मागणी देखील वारंवार कार्यकारी अभियंता, विटा विभाग यांचेकडे केली होती अशी माहिती मिळत आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
         मुंबई शहरात गेल्या अठवड्यात काही तास विजपुरवठा बंद राहीला तर त्याची दखल मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या सर्व वीज कंपण्या , शासन,सर्व राजकिय पक्ष व नियामक आयोगानेही घेतली. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने अशी दखल घेणे योग्य व क्रमप्राप्त आहे हे मान्य केले तरी महाराष्ट्रातील इतर शहरात देखील अशा गलथान कारभार व वायरमन कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या गलथान कारभाराची व खंडीत विजपुरवठ्याच्या प्रकारची दखलही तितक्याच गंभिंरपणे घ्यायला पाहिजे असे मत किरण तारळेकर यांनी व्यक्त केले आहे. 

Post a Comment

0 Comments