Daily Mahasatta

Daily Mahasatta

कडेगाव तालुक्यात वाळू तस्करांची नाकेबंदी

नेर्ली / कडेगाव (संदीप कुलकर्णी)
       कडेगाव तालुक्यातील येरळा नदी पात्रातून वाळू उपसा करण्यास उच्च न्यायालयाची बंदी असूनही हा बंदीचा आदेश मोडीत काढून काही वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करत आहेत. यावर कडेगाव तालुका महसूल विभागाने मोठी कारवाई करीत वांगी ते शेळकबाव नदीच्या पात्रा कडे जाणाऱ्या रस्त्यावर पुन्हा चरी काढून नाकेबंदी केली आहे.
        पूर्वी काढलेल्या चरी वाळूतस्करांनी मुजवलेल्या होत्या. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. सध्या वांगी मध्ये वाळू तस्करी पूर्ण बंद आहे. त्यामुळे या चरी पुन्हा मुजवल्या जाणार नाहीत ती खबरदारी प्रशासन घेत आहे. कडेगाव तालुक्यातील वडियेरायबाग, शिवनी, नेवरी, कान्हरवाडी तसेच रामापुर, येतगाव, तुपेवाडी नदी शेत्रातील रस्ते खुले आहेत. त्या रस्त्यांवर चरी काढण्याचे काम सध्या सुरू आहे. कडेगाव तालुक्यात टेंभू ताकारी योजनेचे पाणी आल्यापासून हा भाग आर्थिक दृष्ट्या सुधारला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इमारती बांधकाम तसेच शासकीय बांधकाम कामे सुरू आहेत यासाठी मोठ्या प्रमाणात वाळूची मागणी वाढली आहे.
रात्री वाळू तस्करी करून दिवसा आलिशान गाडीत फिरणाऱ्या वाळू तस्करांचा तरुणाईवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत आहे. त्यामुळे अनेक तरुण वर्ग वाळू तस्करी करण्याकडे वळताना दिसत आहे.          त्यामुळे गुन्हेगारी वाढ होत आहे. वाळूच्या वाहनांमुळे आतापर्यंत कडेगाव तालुक्यात पंधरा जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे वाळू तस्करी बद्दल अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. वाळू तस्करीला आळा बसावा म्हणून तलाठी व पोलीस प्रशासनाला गुन्हे दाखल करून कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच गावागावातील वाळू साठ्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे वाळू तस्करीला यापुढे आळा बसेल तसेच कोणीही चोरीची वाळू खरेदी करू नये असे आव्हान कडेगाव तालुका तहसीलदार डॉक्टर शैलजा पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments