Daily Mahasatta

Daily Mahasatta

बने हॉस्पिटलने गोर-गरिबांच्या दुःखावर फुंकर मारली :- गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार

पेठ ( रियाज मुल्ला)
      वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे कोरोना च्या पार्श्वभूमीवर जेष्ठ धन्वंतरी स्व. डॉ. एस. एस. बने यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे स्मारकात ७० रक्तदात्यांनी प्रचंड उत्साहात रक्तदान केले. राजारामबापू रक्तपेढी ने रक्तसंकलन केले. वाळवा तालुका सहायक गट विकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांचे हस्ते उदघाटन झाले.
       पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र बर्डे, संजय बने मेमोरियल ट्रस्ट चे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, डॉ. हसीना बने, सी. इ. ओ.संदीप बने, माजी सरपंच प्रकाश पाटील, युवा नेते प्रतापसिंह चव्हाण, (अंत्री) सामाजिक कार्यकर्ते जयवंत चौगुले (पणूब्रे)यांची प्रमुख उपस्थिती होती. 
      स्व.डॉ .एस. एस. बने यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी सहायक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार म्हणाले,"आजचा काळ बदलतोय. तुम्ही तुमचे कार्य करीत राहा प्रशासन पाठीशी आहे. माणसाचं दुःख फुंकणारी माणस निर्माण झाली पाहिजेत. बने भाऊंनी आरोग्य क्षेत्रातील काम निस्वार्थी पणे केले. तुम्ही त्यांचा वसा व वारसा चालवत आहात. तुमच्या जवळ चांगली माणसं आहेत. अडचणींवर मात करत राहा.नवीन पिढीला बने भाऊंचे कार्य व विचार प्रेरणादायी आहेत
       माजी सभापती रवींद्र बर्डे म्हणाले," लोकाभिमुख काम करणारे प्रशाकीय अधिकारी म्हणून अजिंक्य कुंभार यांची ओळख आहे. बने भाऊ नावाचा आरोग्य पंढरीत ला पांडुरंग निघून गेला. गरिबांचे पैसे कमी करणारे डॉक्टर होते". अध्यक्ष बाबासाहेब पाटीलम्हणाले ,"बने भाऊ यांनी कोणताही स्वार्थ साधला नाही. एक चांगलं मन समाजाला दिलं.गरिबांची सेवा केली.युवा नेते राहुल पाटील, नितीन पाटील, सुरेश पाटील, मनीष बर्डे, सचिन बर्डे, डॉ. ए. जी. पाटील, डॉ. अरुण शिंदे, उद्योजक शरद शेटे ,जितेंद्र बने, प्रा. ए. सी. अत्तार, प्रकाश पाटील, डॉ.विशाल पाटील, डॉ. प्रशांत माने, मैमुन तांबोळी, सौ.पद्मश्री बर्डे , बाळासाहेब खराडे,शआधार फाउंडेशन चे अमोल कुंभार, सचिन गवारकर, प्रा. कृष्णा रोकडे, पंकज पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments