Daily Mahasatta

Daily Mahasatta

आ. अनिलभाऊंच्या पाठपुराव्याला यश, नवीन वीज जोडण्यांची कामे जानेवारीपर्यंत पूर्ण होणार

मुंबई : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी चर्चा करताना आमदार अनिलभाऊ बाबर, महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगेरी आदी उपस्थित होते.
विटा ( मनोज देवकर )
         ''एचव्हीडीएस अंतर्गत नवीन वीजजोडण्यांची कामे येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करा. ६०० मीटरपेक्षा अधिक लांबीवर वीजजोडणी असेल तर वाढीव खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यासाठी प्रस्ताव द्या, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.
       खानापूर (जि. सांगली) विधानसभा मतदारसंघातील ऊर्जा विभागाच्या कामांचा आढावा डॉ. राऊत यांनी घेतला. यावेळी आमदार अनिल बाबर, महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगेरी आदी उपस्थित होते. पुणे विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, कोल्हापूरचे मुख्य अभियंता श्री. निर्मळे, सांगलीचे अधिक्षक अभियंता संजय पेटकर हे व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.
         ऊर्जामंत्री डॉ. राऊत म्हणाले, ओव्हरलोडिंगमुळे रोहित्रे नादुरुस्त होण्याच्या समस्या दूर करण्यासाठी ओव्हरलोड झालेल्या रोहित्राशेजारी नवीन रोहित्र उभारण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. ओव्हरलोड रोहित्राशेजारी अतिरिक्त रोहित्र लावण्यासाठी स्वखर्चाने तसेच डीपीडीसीच्या निधीतून रोहित्रे उभारणी करू इच्छिणाऱ्यांना रोहित्रे उभारून देण्यात येतील. जिल्ह्यातील नवीन वीजजोडणीची प्रकरणे (पेड पेंडिंग) 11000 असून तसेच खानापूर विधानसभा मतदारसंघातील 2500 कनेक्शन लवकर देणेचे जाहीर केले. ते प्रस्तावित कृषी पंप वीज जोडणी धोरणात मार्गी लागतील.
          खानापूर मतदारसंघात भिकवडी बु. व घरनिकी येथील नवीन उपकेंद्र उभारणीच्या निविदा लवकर काढण्याच्या सुचना केल्या, तसेच माडगुळे व करगणी येथील 4.5 मेगावॅट सौरऊर्जेचे प्रस्तावित काम चालू करण्याचे आदेश दिले. तसेच सौरउर्जेचे आणखी प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला गती द्यावी. खानापूर येथील मारुती विंड या पवनचक्कीच्या सबस्टेशनमधून देणेत यावेत, त्यामुळे खानापूर व खरसुंडी येथील सबस्टेशनला जादा विज उपलब्ध होईल. आदी मागण्या आ. अनिल बाबर यांनी केल्या. डॉ. राऊत यांनी यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
      त्याचबरोबर महावितरणमधील ३ हजार ५०० पदांच्या भरतीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे, तथापि, मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात  सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबावे लागले असून त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशीही माहिती डॉ. राऊत यांनी दिली. 


 

Post a Comment

0 Comments