Daily Mahasatta

Daily Mahasatta

अवकाळीग्रस्त शेतकरी, व्यापार्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी : आ. सुधीर गाडगीळ

सांगली : नुकसानीचे पंचनामे करून शेतकरी व व्यापार्यांना हेक्टरी सुमारे 50 हजार ते एक लाख रुपये नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यात दिवाळी पूर्वी जमा करावी  अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली आहे.                                                                          

 सांगली ( राजेंद्र काळे)
     अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच नागरिकांच्या आणि व्यापार्यांच्या घराचे, मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तरी प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. या निवेदनाची एक प्रत त्यांनी जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांना दिली आहे.
     निवेदनात म्हंटले आहे,  गेल्या चार पाच दिवसापासून सांगली जिल्ह्यात तसेच राज्यातही अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. त्यामुळे हाता तोंडाला आलेल्या खरीप पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झालेले आहे. काढणी झालेले, मळणीच्या प्रतीक्षेत असलेली अशी सर्व प्रकारची पिके या पावसाने उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळे आपला पालन-पोषण कर्ता बळीराजा कोलमडून पडला आहे.
खरिपाच्या पिकांमध्ये सोयाबीन तसेच इतर कडधान्य भात पिके याबरोबरच द्राक्षा सहित फळबागा आणि ऊस पिकाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष बागा उध्वस्त झाल्या आहेत. तर उसाच्या शेतात पाणी साचून तोही खराब झाला आहे.
       त्याचबरोबर सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात तसेच मिरज पूर्व भागात भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भाजीपाल्याचे ही नुकसान झालेले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतीला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला आधार देण्याची गरज आहे शेतकऱ्यांचे तसेच व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात ते आर्थिक संकटात सापडला आहेत . त्यामुळे तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. प्रत्यक्ष बांधावर शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना रोख अनुदान द्यावे,  तसेच पुराने नागरिकांच्या घरामध्येही पाणी शिरून ज्या घरांचे व मालमत्तेचे नुकसान झालेले आहे अशा घरांचे पंचनामे करून त्यांना रोख अनुदान द्यावे अशी मागणी आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
        तसेच गेल्या वर्षी सन २०१९ मध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुराच्या काळात तत्कालीन महायुती शासनाने पूरग्रस्त शेतीचे घरांचे तसेच व्यापाऱ्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना रोख अनुदान जागेवर दिले होते. त्यानंतर त्यांच्या खात्यातही 50 हजार रुपयापासून 1 लाखापर्यंत ची मदत जमा केली होती. या प्रमाणेच प्रत्यक्ष नुकसानीचे पंचनामे करून व्यापारी व शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान झालेल्या पिकांप्रमाणे हेक्टरी सुमारे 50 हजार ते एक लाख रुपये नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी जमा करावी.    
     

      
गेल्या वर्षीचा महापुर आणि यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे शेतकरी आधीच सर्व बाजूने आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला थोडासा कुठे पावसाने आधार मिळाला होता. मात्र हातातोंडाशी आलेली पिके याच अवकाळी पावसाने हिरावून घेतल्यामुळे तो मोठ्या संकटात सापडला आहे. अशा संकटसमयी बळीराजाला आधार देणे आपले प्राधान्य कर्तव्य आहे अशी मागणी आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री मा. ना. अजित पवार व सांगलीचे पालकमंत्री मा. ना. जयंत पाटील यांना मेलद्वारे पाठविण्यात आली. सदर निवेदन आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांना दिले. यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, गणपती साळुंखे, किरण भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. 


 

Post a Comment

0 Comments