Daily Mahasatta

Daily Mahasatta

मुख्याध्यापिकेची सामाजिक बांधिलकी, ऑनलाईन शिक्षणासाठी चार विद्यार्थ्यांना दिले अँड्राॅइड मोबाईल

महासत्ता सांगली पोर्टल न्यूज इफेक्ट

पेठ ( रियाज मुल्ला)
       कोरोना च्या काळात शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. या उपक्रमांतर्गत ज्या गरीब विद्यार्थ्यांच्या कडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल नाहीत अशा चार होतकरू विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद शाळा सुरुल च्या मुख्याध्यापिका शांता पाटील यांनी अँड्रॉइड मोबाईलचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
        कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण सुरू झाले खरे. मात्र ज्यांची मोबाइल घेण्याची परिस्थिती होती त्यांनी आपल्या पाल्यांना मोबाईल घेऊन दिले. त्यावर ऑनलाइन शिक्षण ही सुरू झाली. मात्र काही मुलांच्याकडे तर मोबाईलच नाही अशी अवस्था होती. त्यासाठी शिक्षण ऑनलाइन पण मोबाईल अभावी विद्यार्थी ऑफलाइन" या मथळ्याखाली  महासत्ता सांगली या पोर्टल मध्ये 17 ऑगस्ट रोजी बातमी प्रकाशित आली होती. या बातमीचा सारासार विचार करून व सहामाही परीक्षेचा जवळचा कालावधी पाहता सौ. शांता पाटील मॅडम यांनी गावातील चार गरीब होतकरू विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाइल वाटप केले व त्यांना शिक्षणाची नवीन दिशा दिल्याने परिसरातील नागरिकांच्यातून त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.
        यावेळी यशवंत दूध संघाचे अध्यक्ष नामदेव पाटील, माजी उपसरपंच मधुकर पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. सविता पाटील, शिवाजी पाटील, शिक्षकवर्ग व पालक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments