Daily Mahasatta

Daily Mahasatta

भाजपा कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांचा आधार बनावे : नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील

इस्लामपूर ( सूर्यकांत शिंदे )
       भाजपा पक्ष हा राजकारणापेक्षा देशहितासाठी प्रामाणिकपणे काम करणारा पक्ष आहे. पक्षाचे विचार घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याने निस्वार्थपणे नागरीकांचे प्रश्न मार्गी लावावेत. कोरोना सारख्या लढाईत एक देशसेवक म्हणुन भाजपा कार्यकर्त्यांनी रुग्णांना आधार द्यावा त्यासाठी मी सदैव तुमच्याबरोबर आहे. भाजपा पक्षाचा देशहिताचा विचार प्रत्येक घरात पोहचवुन प्रत्येकाने राष्ट्र महत्वाचे म्हणुन काम करावे असे मत उरुण- इस्लामपुरचे नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील यांनी व्यक्त केले.
         उरुण- इस्लामपुर नगरपरीषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांची भाजपाच्या सांगली जिल्हा उपाध्यक्ष पदी फेर निवड झाल्याबद्दल इस्लामपुर विधानसभा मतदार संघ भाजपाच्या वतीने निवडक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने सत्कार आयोजीत करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इस्लामपुर भाजपा शहर अध्यक्ष अशोकराव खोत हे होते.
         नगराध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील म्हणाले, गेल्या तीन चार वर्षातील इस्लामपुर विधानसभा मतदार संघात आपण सर्वानी केलेल्या पक्षबांधणी च्या कामाची पोच पावती म्हणजे आपली फेर निवड आहे. पक्षाच्या वरीष्ठ पदाधिकार्‍यांनी या मतदार संघातील भाजपाची वाढती ताकद व त्यामागचे नेतृत्व याची खरी दखल घेऊन पुन्हा आपल्यावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षवाढीसाठी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याने जीवाचे रान करुन प्रयत्न केले आहेत याचे सर्व श्रेय खर्‍या अर्थाने माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला जाते. कार्यकर्ता हीच माझी ओळख व ताकद असुन यापुढे आपण सर्वांनी भाजपा पक्षवाढीसाठी व भविष्यात या मतदार संघात कमळ चिन्ह च बदल घडवेल असे काम करायचे आहे त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला माझ्याकडुन व पक्षाकडुन ताकद दिली जाईल.
सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट आहे . 
        प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर , निशिकांतदादा युथ फौंडेशन च्या माध्यमातुन कोरोना संकट काळात सेवा देण्याचं काम सुरु आहे. आपण या संकट काळात सेवक म्हणून काम करत आहात. या पुढे ही आपण सर्वांनी कोरोना रुग्ण व नातेवाईक यांना धीर व आधार द्यावा,या कोरोनामुळे अनेक गोरगरीबांचे जीनजीवन विस्कळीत झाले आहे ते पुर्वपदावर येण्यासाठी आवश्यक ती आपण सर्वानी मिळुन मदत करुया व भविष्यात या मतदार संघात सन्मानीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे विचार प्रत्येक कुटुंबापर्यत पोहचवुन भाजपा पक्ष अधिक शक्तीशाली बनवुया असे आवाहन केले. 
         यावेळी नुतन पदाधिकार्‍यांचा  सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. भाजपा शहर अध्यक्ष अशोकराव खोत, संघटन सरचिटणीस धैर्यशील मोरे,भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष विकास पाटील, बागणीचे सरपंच संतोष घनवट यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी नगरसेविका कोमल बनसोडे, काकाचीवाडीचे सरपंच प्रमोद माने,माजी नगरसेवक सुभाष शिंगण,ढवळीचे माजी सरपंच शरद पाटील,कसबेडिग्रज चे माजी सरपंच संतोष पिंपळे,हभप निशिकांत शेटेमहाराज,प्रमोद डांगे,गजानन पाटील,सतेज पाटील,प्रविण माने,अक्षय कोळेकर,शरद अवसरे,येडेमच्छिंद्र ग्रा.पं.सदस्य शरद पाटील,रणजीत माने,दिलीप कुंभार,शितल चौगुले,माणिक आवटी,नाथगौंडा पाटील,सुरज पाटील,सचिन जगदाळे,शुभम पाटील,विश्वजीत पाटील,वाहिद मुजावर आदिसह अन्य मान्यवर , पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत व प्रास्थाविक कारंदवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य व भाजपाचे संघटन सरचिटणीस संदीप सावंत यांनी केले, सुत्रसंचलन विक्रम शिंदे यांनी केले. आभार फिरोज पटेल यांनी मानले.

Post a Comment

0 Comments