Daily Mahasatta

Daily Mahasatta

कडेगाव परिसरातील गरीबांचा कैवारी हरपला

डॉ .अरुण रेणुशे यांचे निधन
कडेगाव : (सचिन मोहिते)
       केवळ पैसा  नव्हे तर सेवा हाच स्थायीभाव मनात बाळगून कडेगाव येथील  जुन्या पिढीतील डॉ. अरुण रेणुशे हे जवळपास चाळीस वर्षे अविरत रुग्णसेवा देत राहिले. कित्येक कुटुंबांच्या तीन पिढ्यांना उपचार देणारी त्यांची कारकीर्द प्रदीर्घ ठरली आहे. त्यांच्या जाण्याने कडेगाव शहर व परीसरातील गोरगरिब रुग्णांचा कैवारी हरपला आहे अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतुन येत आहे.
        कडेगाव बसस्थानका पासून हाकेच्याअंतरावर डॉ. रेणुशे यांचे हॉस्पिटल आहे. येथे येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना ते  अत्यल्प अथवा गरज पडल्यास मोफत उपचार देत असत. कदाचित त्यामुळेच कडेगाव शहर व परिसरातील रुग्णांना फॅमिली डॉक्‍टर म्हणून डॉ. रेणुशे  यांच्याकडे उपचारासाठी जाण्यास संकोच वाटत नसे . उपकाराची जाण ठेवत तपासणीचे उधार पैसे तब्बल तीन-चार वर्षांनी आणून देणारे इमानदार पेशंटही त्यांच्याकडे येेेतात असे अनेक किस्से डॉक्टर रेणुशे आवर्जून सांगत असत.
        बऱ्याच रुग्णांना औषधांपेक्षा त्यांचा हातगुणच प्रभावीपणे दिलासा देत. अनेकदा डॉ अरुण रेणुशे व त्यांच्या डॉक्टर पत्नी हे दोघेही  गरजूंना मोफत औषधोपचार देत असत. कोरोनाच्या संकटकाळात डॉ .अरुण रेणुशे यांनी खुप परिश्रम घेत रुग्णसेवा दिली व रुग्णांना आधार दिला. त्यांचा  रुग्णसेवेचा वसा त्यांचे पुत्र डॉ. अभिषेक  हे   पुढे चालवित आहेत. ते छातीरोग 
तज्ञ आहेत. कोरोनाच्या संकटकाळात डॉ. अभिषेक हे  जीव धोक्यात घालून कडेगाव आणि चिंचणी कोविड केअर सेंटर मध्ये रुग्ण सेवा देत आहेत. 
       वडील डॉ अरुण  रेणुशे यांच्या निधनाने पुत्र डॉ. अभिषेक रेणुशे यांच्यासह रेणुशे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. समाजसेवेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणार्या डॉ. अरुण रेणुशे यांना महासत्ता परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली. 


    

Post a Comment

0 Comments