विटा ( मनोज देवकर )
सुमारे दोन महिन्यांपूर्वी दिल्ली रेल्वे स्टेशनवर ८३ किलो सोने जप्त करण्यात आले होते. गुवाहाटी वरून दिल्लीला आलेल्या आठ जणांना ४२ कोटी बाजार मूल्य असलेल्या सोन्यासह डी आर आय ने पकडले होते. त्या संदर्भात आरोपींची अधिक तपासणी करण्यासाठी राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या टीमने आज खानापूर तालुक्यात विविध ठिकाणी छापे टाकले.
या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी दोन महिन्यांपूर्वी दिल्ली रेल्वे स्टेशनवर आठ जणांना सोन्याच्या बिस्किटांसह पकडण्यात आले होते. रविकिरण गायकवाड , पवन कुमार गायकवाड , योगेश हणमंत रुपनर , अभिजित बाबर , सद्दाम पटेल , अवधूत अरुण विभूते , सचिन आप्पासो हसबे , दिलीप लक्ष्मण पाटील अशी आरोपींची नावे आहेत. हे आरोपी खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्यावर बेकायदा प्रतिबंधक हालचाली कायदा १९६७ अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आज या तस्करी प्रकरणी राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या टीमने आज खानापूर तालुक्यात विविध ठिकाणी छापे टाकले.
याप्रकरणी आरोपीनीं नकली आधार कार्ड चा वापर करुन प्रवास केल्यामुळे दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत एन आय ए कडे तपास देण्यात आला आहे. त्यांच्या जवळ मिळालेले सोने हे ९९.९० शुद्धतेचे असून ते दिल्ली , मुंबई च्या बाजारात विकण्यासाठी जाणार होते.
0 Comments