Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाड मध्ये डेंग्यु व चिकनगुनियाचे थैमान

: मनपा अधिकाऱ्याचे दुर्लक्ष

कुपवाड (प्रमोद अथणीकर )
        कुपवाड मनपा क्षेत्रात ८ नंबर वॉर्डात खारेमळा, दक्षिण उल्हासनगर या परिसरात डेंग्यु व चिकन गुनिया या रोगाने थैमान घातले आहे. मात्र मनपा अधिकाऱी या प्रकाराकडे साफ दुर्लक्ष करत आहेत.
         महापालिका क्षेत्रात कोरोना या महाभयानक रोगाचे संकट आहे. त्यातच डेंग्यु आणि चिकनगुनियाची साथ सुरू झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यानी मात्र कुपवाड परिसरातील नागरिकाच्या जीवाशी खेळ चालू केला आहे. कुपवाड परिसरामध्ये खारे मळा या भागात काही दिवसा पुर्वी डेंग्यु व चिकन गुनिया या रोगाचे रुग्ण आढळले आहेत.
       मनपा अधिकाऱ्याने या कडे दुर्लक्ष केले असून एक महिना झाला या ठिकाणी कोणतीही औषध फवारणी केली जात नाही. वेळोवेळी त्या भागातील नागरिक मनपा अधिकारी याच्या या परिसरात औषध फवारणी करण्यासाठी तक्रार करून ही दखल घेतली जात नाही असे या परिसरातील नागरिकांच्यातुन बोलले जात आहे. त्यामुळे कोरोना चे संकट असतानाच आता डेंग्यु व चिकन गुनिया याचे देखील संकट वाढू नये म्हणून मनपा अधिकारी लक्ष देणार का ? असा सवाल नागरिकातून होत आहे.

Post a Comment

0 Comments