Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

वाळवा: कणेगाव फाट्यावर दीड लाखाचा गुटखा जप्त

: कुरळप पोलिसांची मोठी कारवाई; वाहन चालकासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पेठ (रियाज मुल्ला)
        वाळवा तालुक्यातील कणेगाव फाट्यावरून एका पांढऱ्या रंगाच्या ईर्टिका गाडीतुन गुटख्याची वाहतूक होणार असल्याचे गोपिनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आज शनिवार दि 24रोजी सकाळी सात वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे व पो. नाईक अनिल पाटील यानी राष्ट्रीय महामार्गावरील कणेगाव फाट्यावर साफळा लावला होता. यावेळी केलेल्या कारवाईत दीड लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
          मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्र. Mh16 AT2531ही कणेगाव फाट्यावर येताच गाडीला थांबून तपासणी केली असता १ लाख १२ हजार रुपयांचा गुटखा, २० हजार रुपयांचा गुटखा मसाला, १९ हजार ८०० रुपयांची सुगंधी तंबाखू तर ६ हजार रुपयांच्या पॅकिंगमध्ये इतर गुटका सदृश्य वस्तू सापडून आलेल्या आहेत. असा एकूण मिळून १ लाख ६१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तर अधिक माहिती घेतली असता चालक मोहन सुखदेव रासकर वय 23 रा. अहमदनगर हा फिरता व्यापारी असून तो कर्नाटकातील निपाणी वरून Vspmव vs या कंपनीचा पान मसाला ,जाणता राजा पान शॉपचे मालक -किरण पांडुरंग कोकाटे श्रीगोंदा चौक मु पो कष्टिता ता. श्रीगोंदा जी. अहमदनगर यांच्यासाठी घेऊन जात असल्याचे कबूल केले. 
       
 सुमारे पाच लाख रुपयाची ईर्टिका गाडी व पान मसाला असा एकून सहा लाख एकसष्ट हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून वाहन चालक मोहन रासकर व किरण कोकाटे सह vspm व vs या कंपनीवर कुरळप पोलिसात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात दत्तात्रय हनुमंत कोळी अन्नसुरक्षा अधिकारी सांगली यांनी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे करत आहेत.

Post a Comment

0 Comments