Dainik Mahasatta

Dainik Mahasatta

खानापूर तालुक्यात आज २५ कोरोना पॉझिटिव्ह

: विटा शहरात १६ तर ग्रामीण भागात ९ रुग्ण

विटा ( मनोज देवकर )
        खानापूर तालुक्यात आज दिवसभरात २५ रुग्णांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामध्ये विटा शहरातील आदर्शनगर येथील १, विवेकानंद नगर मधील ४, बाबर गल्लीतील १ , लेंगरे रोड परिसरातील १ , सावरकर नगर मधील १, गांधीनगर मधील २ व आय टी आय परिसरातील एकाचा समावेश आहे.
         ढवळेश्वर मधील ५ जणांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. नागेवाडी येथील दोन तर सुलतान गादे व पोसेवाडी तील दोघे पॉझिटिव्ह आलेत. आजअखेर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ५६९ वर पोहचली आहे. आजवर च्या कोरोना रुग्णांची १८९१ वर पोहचली आहे. त्यातील १२६९ रुग्ण बरे झाले असून ५३ लोकांनी प्राण गमावलेत.

Post a Comment

0 Comments