Daily Mahasatta

Daily Mahasatta

विटेकरांनो...सावधान ! कोरोना वाढतोय

: आज तालुक्यात ३४ तर विट्यात १९ पॉझिटिव्ह
विटा ( मनोज देवकर )
      सगळीकडे कोरोना चे भय कमी झाल्याचे चित्र असताना आज खानापूर तालुक्यात ३४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. विट्यात आज १९ जणांच्या कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. पारे गावात पाच, हिवरे मध्ये तीन , चिंचणी मंगरूळ मधील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आलेत.
     खानापूर , करंजे , कार्वे , वाझर , नागेवाडी येथील प्रत्येकी  एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे . तालुक्यात सद्या  ३२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १८८३ रुग्ण आजवर बरे झाले असून तालुक्यातील ६४ रुग्ण मरण पावले आहेत . 
      विटा शहरातील दोन कोविड सेंटर्स पुरेशी रुग्ण संख्या नसल्याने बंद करण्यात आली . कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला होता. देश व राज्यात सर्वत्र  अनलॉक ची प्रक्रिया सुरू असली तरी पूर्णतः बेफिकीर राहणे योग्य नाही

Post a Comment

0 Comments