Daily Mahasatta

Daily Mahasatta

कुपवाड येथील गुटखा विक्रेता गजाआड : सुमारे ७५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

कुपवाड (प्रमोद अथणीकर)
        कुपवाड औधोगिक वसाहती मध्ये आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास एक इसम सुगंधी तंबाखू व गुटखा विकत असताना त्यास कुपवाड पोलिसांनी अटक करून सुमारे ७४ हजार २५४ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
          मिळालेल्या माहितीनुसार कुपवाड औधोगिक वसाहती मध्ये पान टपरी मध्ये गुटखा विकण्यासाठी आलेल्या मौला रफिक तांबोळी (वय वर्ष 28 रा फौजदार गल्ली, खणभाग सांगली) या इसमास म सुगंधी तंबाखू व गुटखा विकत असताना पोलिसांनी रंगे हात पकडले. त्याच्या जवळ असणारे वेगवेगळ्या नावाच्या सुगंधी तंबाखू व गुटखा असा एकूण सुमारे 74, 254 इतक्या किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून त्यास अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निरज उबाळे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments