जतमध्ये महिलेच्या पोटातून काढला पाच किलोचा गोळा ; स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रविंद्र आरळी यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून दिले महिलेला जीवदान

जत (सोमनिंग कोळी) 
        जतचे प्रसिध्द स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर रविंद्र आरळी यांच्या रुग्णालयात सोलापूर येथील महिला रत्नाबाई जकाते या एका 45 वर्षीय महिलेच्या पोटातून पाच किलोचा गोळा शस्त्रक्रियेनंतर काढण्यात यश आला. डॉक्टर रविंद्र आरळी यांचे कै. शांताबाई शिवशंकर आरळी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर आरळी व त्यांच्या टीमने यशस्वी शस्त्रक्रिया करून महिलेला जीवदान दिले.
           एका महिलेच्या अंडाशयातून तब्बल 5 किलोची गाठ काढण्यात आली आहे. या महिलेची शस्त्रक्रिया यशस्वी होईल की नाही, याबद्दल डॉक्टरांना साशंकता होती. मात्र डॉक्टर आरळी यांच्या अथक प्रयत्नाने ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानं डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण रत्नाबाई यांनी अनेक हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते. काही कमी झालेला नव्हता मात्र त्यांना काही जणांनी डॉक्टर आरळी हॉस्पिटलला दाखवण्याचे सल्ला दिला. रत्नाबाई यांनी आरळी यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले डॉक्टरांनी सर्व तपासण्या करून घेतले. डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे निर्णय घेतला. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
          सोलापूरची रहिवासी असणाऱ्या रत्नाबाई जकाते यांच्या पोटातून तब्बल 5 किलोची गाठ काढण्यात आली. रत्नाबाई जकाते यांच्या पोटाचा आकार काही महिन्यांपासून वाढत होता. सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर वेदना सुरू झाल्यानं त्यांनी औषधं घेण्यास सुरुवात केली. वेदना कमी होत नसल्यानं रत्नाबाई जवळच्या अनेक डॉक्टरकडे गेल्या.पोटातील गाठ मोठी असल्यानं डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता कमी असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती.
पोटातील गाठ मोठी झाल्यानं त्यावेळी पोटात असह्य वेदना सुरू होत्या, असं रत्नाबाई जकाते यांनी सांगितलं. 
       मला जेवणदेखील करता येत नव्हतं. इतकंच काय मला घरातील सहजसोपी कामंदेखील करता येत नव्हती, अशी माहिती रत्नाबाई यांनी शस्त्रक्रियेनंतर दिली. सोलापूर, कर्नाटकमधील इंडी, विजापूर येथील डॉक्टरानी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिल्यानंतर रत्नाबाई जकाते यांनी काही महिलेच्या सल्ल्याने जतमधील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर रविंद्र आरळी यांच्या रुग्णालयात गेल्या. या टीमनं त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. रत्नाबाई यांच्या पोटातून 5 किलोची गाठ काढण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी 2 तास लागले.

Post a comment

0 Comments