खानापूर तालुक्यात आज २२ पॉझिटिव्ह

: विटा शहरात १० तर ग्रामीण भागात १२ रुग्ण
विटा ( मनोज देवकर )
        खानापूर तालुक्यात आज दिवसभरात २२ रुग्णांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. लेंगरे आणि बलवडी ( खा ) गावात प्रत्येकी दोन तर साळशिंगे , रामनगर , गोरेवाडी , करंजे , ढवळेश्वर , नागेवाडी , चिंचणी ( मंगरूळ) , भिकवडी ( बु. ) या गावात प्रत्येकी एक अश्या 12 रुग्णांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. आज विट्यात १० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तासगाव तालुक्यातील वंजारवाडी येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.
       आज दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून तालुक्यातील कोरोना मुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ५५ वर पोहचली आहे. १३३४ रुग्ण बरे झाले आहेत तर ५५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Post a comment

0 Comments