पैगंबरांचे विचार तळागाळापर्यंत पोहचायला हवेत : कृष्णात पिंगळे

पेठ ( रियाज मुल्ला)
       पैगंबरांनी मानवतेचा, शांततेचा, सर्वधर्म समभावाचा संदेश दिला असून त्यांचे आचार विचार तळागाळापर्यंत पोहोचायला हवेत, असे मत उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी व्यक्त केले.
         पेठ तालुका वाळवा येथे पैगंबर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेठच्या सरपंच मीनाक्षीताई महाडिक होत्या.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना कोडक, डॉ. वैशाली देवापुरे व आशा सेविकांना कोविड योद्धा म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव भांबुरे तर आभार आयुब संदे यांनी मानले. याप्रसंगी पिरअल्ली पुणेकर, शकील सय्यद , दीपक कोटावळे, संपतराव पाटील, डॉ. प्रदीप शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यकर्माचे आयोजन हजरत पीर कासमसाहेब बाबा दर्गा ट्रस्ट, मोहरम मंडळ, हजरत ख्वाजा गरीब नवाज अहले सुन्नत जमात, आशिकी ए हुसैन ग्रुप गोळेवाडी, सरकार गौसे आजम पैगंबर समिती, हजरत मदार साहेब दर्गा ग्रुप, हजरत फातिमा सुन्नी महिला मंच यांनी केले होते.

Post a comment

0 Comments