Daily Mahasatta

Daily Mahasatta

नो मास्क, नो भाजीपाला, पलूस मध्ये नाविन्यपूर्ण मोहिम

: गटविकासाधिकारी डाॅ स्मिता पाटील यांची माहिती पलूस (अमर मुल्ला )
       कोरोना मुक्त गांव, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेला चांगला प्रतिसाद मिळत असून नो मास्क नो भाजीपाला, नो मास्क- नो किराणा असे नाविन्यपूर्ण फलक झळकून लोक या मोहिमेत सहभागी होत आहेत, अशी माहिती गटविकासाधिकारी डाॅ. स्मिता पाटील यांनी दिली आहे.
        जागतिक महामारी कोव्हिड १९ या विषाणू ने जगात थैमान घातले आहे. तब्बल आठ महिने झाले कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे.आर्थिक परिस्थिती पाहता सरकारने काही अटींवर शिथिलता आणलेली आहे. परंतु जनसामान्यांमध्ये असलेली भिती दूर करणे , सर्दी , खोकला , ताप , श्वसनाचा त्रास , धाप लागणे , रस गंध नसणे ही कोरोणाची लक्षणे माहिती होणे ,कोरोणा नियंत्रण मोहिमेमध्ये जनतेचा सहभाग घेणे व जनतेच्या सहभागातून कोरोणापासून सुरक्षित व्यक्ती , गांव , तालुका , जिल्हा ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकारी यांचे संकल्पनेतून " कोरोना सुरक्षित‌ ग्राम " ही संकल्पना मोहीम राबविण्याचे धोरण ठरविणेत आले आहे. ही मोहीम दि.५ आॅक्टोंबर ते दि.३१ आॅक्टोंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे.
        तहसिल कार्यालय पलूस येथे उपविभागीय अधिकारी गणेश मरकड , तहसिलदार राजेंद्र पोळ , गटविकास अधिकारी डॉ.स्मिता पाटील , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रागिनी पवार , नायब तहसीलदार राजेंद्र पाटील ,उप कोषागार अधिकारी राजेश जगताप , पत्रकार व इलेक्ट्रॉनिक मिडिया यांचे उपस्थित "कोरोना सुरक्षित ग्राम " ही मोहीम राबविणेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली .या मोहिमेत राबविले जाणाले निकष
गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे.धार्मिक सार्वजनिक कार्यक्रम जसे लग्न समारंभ, अंत्यसंस्कार,प्राथनास्थळे अशा ठिकाणी शासनाच्या नियमानुसार संख्या असणे बंधनकारक आहे.मास्कचा वापर बंधनकारक असून मास्क वापराशिवाय कोणतेही उद्योग धंदे न करणे ,विनामास्क बाहेर पडणाऱ्या व्यक्तीस २००रुपये दंड ठोठावला जाणार.वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत व सॅनेटाईझरचा वापर करावा.गांव स्थरावर कोव्हिड योध्दे तयार करावेत.सामुदायिक सामाजिक दायित्व अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेवक, अंगणवाडी सेविका , नागरिक यांना देण्यात आलेले कोरोना प्रतिबंधात्मक साहित्य व सामुग्री द्वारे देण्यात आलेला आधार तसेच काॅल सेंटर,टेलिमेडिसिन सेंटर, तालुका स्तरीय नियंत्रण कक्ष,गृह विलगीकरण कक्ष,बेडची उपलब्धता याबद्दल माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
      गांव स्तरावर वकृत्व, निबंध, रांगोळी,चित्रकला अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्यातून कोरोना मुक्त गांव मोहीम अंतर्गत तीन क्रमांक निवडण्यात येणार असल्याचे ही यावेळी सांगण्यात आले.तरी तालुक्यातील जनतेने या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे व आपले गांव, तालुका, जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे असे तालुका प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. या मोहिमेत अनेक लोक सहभागी होत असून नो मास्क, नो भाजीपाला हे फलक लक्षवेधी ठरत आहेत अशी माहिती गटविकासाधिकारी डाॅ स्मिता पाटील यांनी दिली आहे. 

Post a Comment

0 Comments