Daily Mahasatta

Daily Mahasatta

यशवंत साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालवणार : संजय काका पाटील

नागेवाडी : यशवंत साखर कारखान्याच्या रोलर पूजन प्रसंगी पारसनाथ बाबा, खास. संजयकाका पाटील, सभापती महावीर शिंदे, सुहास नाना शिंदे, शंकर नाना मोहिते, सतिश निकम, ईश्वरशेठ जाधव व अन्य.

विटा : (मनोज देवकर)
        या वर्षीचा गळीत हंगाम यशवंत साखर कारखाना पूर्ण क्षमतेने करणार आहे. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव देणार असल्याचे मत खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केले.
        नागेवाडी तालुका खानापूर येथे यशवंत सहकारी साखर कारखान्याचे रोलर पूजन आणि हॉपर पूजन  पारसनाथ बाबा यांच्या हस्ते आणि खासदार संजय काका पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी बोलताना संजय काका पाटील म्हणाले, यावर्षी यशवंत सहकारी कारखाना शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव देणार आहे. तसेच चालू गळीत हंगाम कारखाना पूर्ण क्षमतेने करणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.      
         यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास नाना शिंदे, सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते, खानापूर पंचायत समितीचे सभापती महावीर शिंदे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश निकम, ईश्वर सेठ जाधव शहाजी शेठ पाटील राजकुमार निकम, संजय मोहिते, मनोहर रावताळे,  संतोष बागल,  पृथ्वीराज शिंदे यांच्या सह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते 


 

Post a Comment

0 Comments