Daily Mahasatta

Daily Mahasatta

कंठी खून प्रकरणातील तिघे फरार आरोपी एलसीबी च्या जाळ्यात ; सोलापूर मधील हुलजंती येथून अटक

जत (सोमनिंग कोळी)
        जत तालुक्यातील कंठी येथे धनाजी नामदेव मोटे (वय ४३) याचा गोळ्या झाडून व निर्घृणपणे डोक्यात हत्याराने वार करून खून करण्यात आला होता. ही घटना गुरुवारी रात्री घडली होती. खून प्रकरणी चौघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
        नागेश भीमा लांडगे यास 14 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर मोटे खून प्रकरणातील तिघे संशयित अद्याप फरारी होते. या तिघांच्या अटकेसाठी तीन पथके वेगवेगळ्या भागात रवाना झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक दोनच दिवसात या प्रकरणातील फरार आरोपीं गोविंद नागेश लांडगे, मुरलीधर मधुकर वाघमारे, श्रीधर मधुकर वाघमारे, यांना मंगळवेढा तालुक्यातील हुलजती येथून ताब्यात घेण्यात आला आहे. या आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण शिंदे, अभिजित सावंत, पोलीस हवालदार , जितेंद्र जाधव, राजू शिरोलकर, राजाराम मुळे, संदीप गुरव संदीप पाटील, संदीप नलवडे, अनिल कोळेकर यांनी केली.

Post a Comment

0 Comments