Daily Mahasatta

Daily Mahasatta

सांगली जिल्ह्यात शेतकरी विरोधी काळया कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसची स्वाक्षरी मोहीमसांगली, (प्रतिनिधी)
        केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी काळया कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. आज नांद्रे आणि कावजी खोतवाडी येथे सह्या करण्यासाठी शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली. काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाक्षऱ्यांची मोहीम सुरू करण्यात आली.

      केंद्र सरकारने बळाचा वापर करून शेतकऱ्यांविरोधात तीन काळे कायदे तयार केले आहेत, या कायद्यांमुळे शेतकरी संपुष्टात येणार आहे, त्याने उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळणार नाही. भांडवलदार लोकांच्या तुंबड्या भरण्यासाठी हे कायदे केले आहेत. कंत्राटी शेती आली तर शेतकऱ्यांना जगणे मुश्कील होणार आहे, त्यामुळे हे कायदे रद्द करावेत, यासाठी काँग्रेसने गेल्या महिन्यापासून तीव्र आंदोलन सुरू केले आहे.

      स्वाक्षऱ्यांचे हे निवेदन राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार आहे. आज नांद्रे येथे सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य प्रकाश चौधरी, वीर सेवादलाचे सल्लागार सदस्य सुधीर चौधरी, नांद्रे विविध सोसायटीचे माजी चेअरमन मनोज पाटील, विकास पाणीपुरवठा योजनेचे चेअरमन अमित पाटील, उपसरपंच सुहास पाटील, आशीर्वाद पतसंस्थेचे चेअरमन विशाल पाटील, येरळामाई पाणीपुरवठा योजनेचे चेअरमन गुणधर्म पाचोरे, किशोर पाटील, आयुब कागदी, पवन महाजन, सुनील पाचोरे तसेच ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.

       कावजी खोतवाडी येथेही सह्यांची मोहीम उघडण्यात आली. यावेळी सरपंच संजय सूर्यवंशी, दशरथ मुळिक, योगेश पाटील, बजरंग पाटील, हिंमत पाटील, सुहास मुळिक, रमेश जाधव, निलेश पाटील, वसंत सूर्यवंशी, विजय पाटील आणि शेतकरी उपस्थित होते.
----

Post a Comment

0 Comments