Daily Mahasatta

Daily Mahasatta

शरद पवारांच्या खांद्यावर बसून रोहित पवार स्वतःची उंची मोजतात : गोपीचंद पडळकर यांची टिका

विटा (  मनोज देवकर )
        कर्जत  मतदार संघातील मिरजगाव येथील रस्त्यांवरील खड्डे दाखवत भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर टिका केली आहे. रोहित पवार सोशल मीडियातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वर टिका करत असतात. सल्ले देत असतात. गेली पन्नास वर्षे जे राज्याचे नेतृत्व करत आहेत अश्या शरद पवार यांच्या खांद्यावर बसून स्वतः ची उंची रोहित पवार मोजतात. त्यांनी आधी त्यांच्या मतदारसंघातील कामाकडे लक्ष द्यावे अशी टिका पडळकर यांनी केली.
        कर्जत मतदारसंघातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करत त्यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.यापूर्वीही पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली होती. त्यानंतर राज्यभरात आंदोलन आणि प्रतिआंदोलन करण्यात आले होते. आमदार पडळकर यांच्या टीकेला आमदार रोहित पवार काय उत्तर देणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
        मा.शरद पवारांच्या खांद्यावर बसुन मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या आ. रोहित पवारांनी खांद्यावरून खाली मतदार संघात उतरावे व मतदार संघातील कामावर लक्ष द्यावे. मोदी साहेब व फडणवीस साहेबांना सल्ले देत बसू नये असा सल्ला  आमदार पडळकर यांनी दिला आहे. 


 

Post a Comment

0 Comments