Daily Mahasatta

Daily Mahasatta

विट्यातील धर्मादाय संस्थाचे सल्लागार अॅड. दिलीप म्हेत्रे यांचे निधन

विटा (प्रतिनिधी)

        येथील अॅड. दिलीप रघुनाथ म्हेत्रे (वय -६८) यांचे  अल्पशा आजाराने  निधन झाले. गेली अनेक वर्षे परिसरातील सर्व धर्मादाय संस्थांचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणुन ते परिचीत होते. ते देवांग समाज ट्रस्टचे सल्लागार सदस्य तर श्री विठ्ठल मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणुन कार्यरत होते. देवांग समाज ट्रस्टच्या माध्यमातुन शहरातील श्री चौंडेश्वरी मंदिराच्या उभारणी  व वाटचालीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. तसेच गेली अनेक वर्षे ते विटा प्रवासी संघटनेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातुन  बस प्रवाशांच्या  सुविधांसाठी सात्तत्याने कार्यरत होते.
           विट्यात श्री चौंडेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेच्या माध्यमातुन विटा शहरात पतसंस्थांच्या उभारणीस त्यांनी गती दिली होती. विट्यातील अॅड. अमृत म्हेत्रे यांचे ते वडिल असुन त्यांच्या मागे भाऊ, भावजयी, पत्नी दोन मुले, नातवंडे व पुतणे असा मोठा एकत्र परिवार आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मर्यादीत नातलगांच्या उपस्थितीमध्ये कराड रोडच्या स्मशानभुमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवार दि.०२ रोजी केवळ मर्यादीत नातेवाईकांच्या उपस्थितीत रक्षाविसर्जन होणार असुन संबधीत, मित्र व नातेवाईकांनी  कोरोना संक्रमणाची स्थिती व प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांचा आदर करुन  कोणीही समक्ष उपस्थित न राहता आपल्या भावना व्यक्त कराव्यात असे आवाहन म्हेत्रे परिवाराने केले आहे. अॅड. दिलीप म्हेत्रे यांच्या निधनानंतर माजी उपनगराध्यक्ष किरणभाऊ तारळेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  

Post a Comment

0 Comments