Daily Mahasatta

Daily Mahasatta

गजानन मगदूम यांची स्थायी सभापतीपदाची प्रबळ दावेदारी

: विविध सामाजिक संघटनाही एकवटल्या

कुपवाड ( प्रमोद अथणीकर)
          कुपवाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गजानन मगदूम यांची स्थायी सभापतीपदी निवड करावी अशी एकमुखी मागणी कुपवाड मधून होत आहे. या मागणीसाठी शहरातील विविध सामाजिक संघटनानी मगदूम यांना पाठीत दर्शवला आहे.
         सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या स्थानापासून गेल्या बावीस वर्षात कुपवाड ला महत्त्वाचे पद मिळाले नाही. महापालिकेत असूनही कुपवाड शहराचा अद्याप पर्यंत विकास झाला नाही. त्यामुळे प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी महापालिकेचे स्थायी सभापती पद कुपवाड शहरातील भाजपाचे नगरसेवक गजानन मगदूम यांना मिळावे अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. मनपा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून येऊन भारतीय जनता पार्टीस पाठिंबा दिल्याने ते स्थायी सभापती पदासाठी प्रबळ दावेदार आहेत असे मत विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
        व्यापारी महासंघाचे राजेंद्र पवार म्हणाले की , नगरसेवक मगदूम यांची प्रशासनावर चांगली पकड आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला चांगले मताधिक्य मिळविण्यात त्यांचा खारीचा वाटा आहे. त्यांच्या पंचवीस वर्षातील राजकीय कारकिर्दीसह सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांचा अनुभव लक्षात घेता त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे. त्यांना संधी मिळाल्यास विकासा पासून वंचित असणाऱ्या कुपवाड शहराला भरघोस निधी आणि विविध योजना शहरासाठी खेचून आणता येतील.
बैठकीत कुपवाड संघर्ष समितीचे विजय खोत, हणमंत सरगर, आशुतोष धोतरे, कृष्णा व्हॅली चेंबरचे उपाध्यक्ष रमेश आरवाडे, शाम भाट, नाभिक संघटनेचे कल्लापा कोरे, व्यापारी संघटनेचे रमेश जाधव, बापूसाहेब तोडकर यांच्यासह विविध संघटनेतील सदस्यांनी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments