Daily Mahasatta

Daily Mahasatta

जतमध्ये विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई; महिन्याभरात 75 हजाराचा दंड वसूल

जत ( सोमनिंग कोळी)
      जत शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात येत असून गेल्या महिनाभरात 75 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
      अनलॉकमध्ये हळूहळू आयुष्य मूळपदावर येत असले तरी आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी वारंवार मास्क, फिजिकल डिस्टन्स पाळण्याची विनंती प्रशासनाकडून केली जात आहे. मध्यंतरी जिल्ह्यातील दोन नंबरचे कोरोना हॉटस्पॉट सेंटर म्हणून जत तालुक्याची ओळख झाली होती.
        तरीही जतकर मात्र बिनधास्तपणे मास्क न वापरता फिरत आहेत. अशा नागरिकांवर जत ट्रॉपिक पोलीसानी कारवाई सुरू केली आहे. एका महिन्यात 252 केसेस करत 50 हजारापेक्षा जास्त दंड जतकरांकडून वसूल केला आहे. तर नगरपरिषदेकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींकडून महिन्याभरात 25 हजारांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाही जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई व पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॉपिक पोलीस कर्मचारी महादेव मडसनाळ,विठ्ठल तेली व होमगार्ड महेश मदने, दत्तू व्हाळगुळे व नगरपरिषदेचे कर्मचारी यांनी केली आहे.
..............................
सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मास्क न वापरणार्या नागरिकांवर ही कारवाई करण्यात येत आहे.सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई सुरू असून नागरिकांकडून नियमांचे पालन व्हावे यासाठी त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. शहरात पालिका प्रशासनाकडून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. जतकरानी कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाला प्रतिसाद देणे गरजेचे आहे.

मनोजकुमार देसाई
जत नगरपरिषद,मुख्याधिकारी

.......................................

जत शहरात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रशासन कोरोना अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. शहरातील चौकाचौकात पोलीस आणि नगरपरिषदेचे कर्मचारी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाबरोबर नागरिकांनीही लढा दिला पाहिजे.

उत्तम जाधव
जत पोलीस निरीक्षक

......................................

Post a Comment

0 Comments