Daily Mahasatta

Daily Mahasatta

हुतात्मा कारखान्याचा अंतीम दर 2968.28 रुपये जाहीर : मा. वैभव नायकवडी


वाळवा ( रहीम पठाण)
      पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथआण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचा अंतिम दर 2968.28/- रुपये जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती चेअरमन मा.वैभव नायकवडी यांनी दिली आहे.
       गळीत हंगाम सन 2019-2020 मध्ये गाळप करण्यात आलेल्या ऊसास  पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथआण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सह.साखर कारखान्याचा अंतिम दर  2968.28/-  जमा करण्यात आल्याचे कारखान्याचे चेअरमन मा.वैभव नायकवडी(काका) यानी जाहीर केले आहे. सन 2019-20 मध्ये कारखान्यात 12.68% रीकव्हरीने 7,33,800 क्विंटल साखर उत्पादीत करण्यात आली आहे. या अगोदर 2650/- प्रमाणे बिल अदा करण्यात आले आहे. उर्वरीत 318/- प्रमाणे 18,41,64,782 पैकी सहमतीने प्रकल्प ठेव प्रति मेटन 100/- प्रमाणे घेऊन 218/- प्रमाणे संबंधित सभासद खातेवरती गुरुवारी 8/10/2020 रोजी जमा करण्यात आले आहेत.
       पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथआण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सह.साखर कारखाना सतत सभासद हिताचेच निर्णय घेत असतो. कारखान्यात येणाऱ्या ऊसातून 1% बायडींग मटेरीयल कपात केले जात नाही. कारखाना माध्यमातून ऊस उत्पादन वाढीसाठी अनेक प्रयत्न केले जातात हिरवळीची खते, ताग, धैचा (मोफत) कंपोस्ट ऊस बियाणे ऊस पारदर्शक योजनेतून पुरवठा करण्यात येत आहे. सतत सभासद, कारखाना कामगार, व ऊस मजूरांना अधिकाधिक सुविधा दिल्या जातात अशी माहिती चेअरमन वैभव काका नायकवडी यांनी दिली आहे.
      या वेळी व्हाईस चेअरमन बाबुराव बोरगांवकर सर्व संचालक, कार्यकारी संचालक,  चिफ अकौंटन्ट, चिफ केमिस्ट, शेती अधिकारी आदी उपस्थित होते. 


 

Post a Comment

0 Comments