Daily Mahasatta

Daily Mahasatta

Good news सांगली जिल्ह्यात आज ४३०पाॅझीटीव्ह तर ८५५ कोरोनामुक्त

: सलग सात दिवस कोरोनाग्रस्तांची संख्या आटोक्यात राखण्यात प्रशासनाला यश

सांगली (राजेंद्र काळे )
        सांगली जिल्ह्यात गेल्या सात दिवसापासून दररोजच्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त होणार्या संख्येत वाढ होत असल्याचे समाधानकारक चित्र पहायला मिळत आहे. आज रविवार ता. २७ रोजी ४३० रुग्णाचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर यापेक्षा जादा म्हणजेच ८५५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
           सांगली जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ सुरू होती. मात्र गेल्या सात दिवसात ही वाढ आटोक्यात राहिली आहे तर कोरोनामुक्त होणार्या संख्येत दिलासादायक वाढ होत आहे. आज रविवार ता.२७ रोजी ४३० रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आले आहेत. तर दिवसभरात ८५५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आज ता. २७ रोजी सांगली महापालिका क्षेत्रात १३८ रुग्णांचे कोरोनाचं अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये सांगली शहर ९६ तर मिरज शहरातील ४२ रुग्णांचा समावेश आहे. तसेच आटपाडी- ८, जत -११, कडेगाव - ४३ कवठेमंकाळ -२१, खानापूर - २९, मिरज- ६३ पलूस- ३२ शिराळा- १६, तासगाव- ३६ आणि वाळवा -३३ इतक्या रुग्णांचा समावेश आहे. तर सांगली जिल्ह्यात आज २८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ संजय साळुंखे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments